श्रीरामपुर-नेवासा राज्यमार्गावर टाकळीभान परीसरात रस्त्याच्या बाजुने वाढलेले काटेरी झुडपे.

सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)

टाकळीभान-श्रीरामपुर-नेवासा राज्य मार्गावर टाकळीभान परीसरात साईडपट्टीच्या बाजुने वाढलेल्या काटेरी बाभळी आणि झुडपांमुळे वाहनचालकांना प्रवासात धोका निर्माण झाला आहे.रस्त्याच्या बाजुस वाढलेल्या या झुडपांमुळे अडथळा निर्माण होऊन वाहनचालकांवर आपत्ती ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
         रस्त्याची साईडपट्टी ही रस्त्याचाच एक भाग मानली जाते.त्यामुळे रस्त्याच्या देखभालीसोबत साईडपट्टीची देखभाल देखील आवश्यक असते.श्रीरामपुर-नेवासा मार्गावर  रस्त्याच्या कडेला वाढलेल्या काटेरी झुडपांचा व बाभळींचा रस्त्यामधे शिरकाव झाला आहे.शिरकाव झालेल्या बाभळींमुळे अपघात होण्याचा धोका आहे.हा राज्यमार्ग नेहमीचा वर्दळीचा मार्ग असुन दुचाकी,चारचाकी व अवजड वाहनांची या मार्गावरुन वाहतुक सुरु असते.दोन वर्षांपुर्वी या मार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर या मार्गावरील वाहनांचा वेगही कमालीचा वाढला आहे.त्यामुळे संबंधित ठिकाणच्या काटेरी झुडपांचे अडथळे दुर करुन राज्यमार्ग झुडपातुन मुक्त करण्यात यावा व वाहनचालकांना दिलासा द्यावा अशी मागणी सध्या वाहनचालकांमधुन होत आहे.
       सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या काटेरी बाभळी व झुडपांची वाढही झपाट्याने होत आहे.या रस्त्याची देखभाल करणारे ठेकेदार तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments