सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)
दिलीप शिंदे
सोयगाव दि.०७- संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. ०७ शुक्रवारी वंदे मातरम सार्थशताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर कार्यक्रमास महाविद्यालयाचे पदव्युत्तर समन्वयक डॉ. शत्रुघ्न भोरे तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. श्रीकृष्ण परिहार आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयांमध्ये वंदे मातरम गीता संदर्भात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ. श्रीकृष्ण परीहार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांना वंदे मातरम गीता संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे कनिष्ठ विभाग प्रमुख डॉ. उल्हास पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पंकज गावीत, डॉ.सुनील चौधरे महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश गावडे यांनी केले तर डॉ. सुनील चौधरे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश गावडे, डॉ. पंकज गावित, डॉ. सुनील चौधरे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments