शेतकऱ्यांच्या अनुदान प्रक्रियेला गती देण्याची तहसीलदार यांच्याकडे पुष्पा काळे यांची मागणी--




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.०७--  सोयगाव तहसीलदार मनीषा मेने- जोगदंड  यांची दि.०७ शुक्रवारी भेट घेत तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप अनुदान जमा झालेले नाही, त्या अनुदान प्रक्रियेची गती वाढवून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांनीं केली आहे. दरम्यान तालुक्यातील सामाईक क्षेत्र अनुदान व फळबाग अनुदान या विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. 
पात्र शेतकऱ्यांना फळबाग अनुदान मिळण्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक ती तत्काळ कार्यवाही करावी, अशी विनंती देखील पुष्पा काळे यांनी तहसीलदार यांच्याकडे केली.यावेळी जिल्हा सरचिटणीस सुनील गावंडे, तालुका अध्यक्ष संजय पाटील, आमखेडा सरपंच नंदा आगे, दिलीप पाटील, रवींद्र पाटील,  खरेदी विक्री संघाचे संचालक मंगेश सोहनी, मयूर मनगटे, मुन्ना ढगे, अरूण सोनी, संजय आगे,अर्जुन ढगे, राजेंद्र म्हस्के यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments