सावळीविहीर बुद्रुक येथे कार्तिक मास काकडा भजन आरती महोत्सवाची महिला भजनी मंडळा कडून उत्साहात सांगता!

सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)

शिर्डी (राजकुमार गडकरी)--   कार्तिक महिना हा धार्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा महिना समजला जातो. या महिन्यात पहाटे प्रत्येक गावात व मंदिरात काकडा आरती केली जाते. ही प्रथा अनेक वर्षापासून प्रचलित आहे. 
काकडा आरती  म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय. या वेळी देवाच्या मूर्तींला काकडयाने (एक प्रकारची ज्योत) ओवाळले जाते, म्हणून याला काकडा आरती असे म्हणतात. भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकडा आरती केली जाते. महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष्ट काळात, विशेषतः कार्तिक महिन्यात काकडा आरती केली जाते.असा महिनाभर चालणारा काकडा आरतीचा हा धार्मिक उत्सव राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील श्री हनुमान मंदिरातही गेले महिनाभर सुरू होता. त्याची त्रिपुरारी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला बुधवारी नुकतीच उत्साहात सांगता झाली. 

     सावळीविहीर बुद्रुक येथे गावातील श्री हनुमान मंदिरात महिला भजनी मंडळाच्या वतीने कार्तिक महिना सुरू झाल्यानंतर दररोज पहाटे काकडा आरती करण्यात येत होती. त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागवण्यासाठी मंदिरात काकडा आरती करण्यात येत होती. दररोज गावातील महिला भजनी मंडळातील महिला हभप बेबीताई सोनवणे, पद्माताई कापसे, सुनिता सतीश जपे, श्रीमती शकुंतलाबाई औटी , श्रीमती कदम, सौ. मंदाताई कापसे, श्रीमती जपे मावशी, लकारे मावशी,सुनिता गायकवाड, श्रीमती वाघ, श्रीमती नानी दहिवाळ, श्रीमती वैशालीताई जपे, सीताबाई कामठे, जपेताई,आदी महिलांनी हा काकडा आरतीचा महिनाभर उत्सव मोठ्या उत्साहात पहाटे मंदिरात साजरा केला.काकडा आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली  ही आरती होय. 
भक्तिचिये पोटी बोध काकडा ज्योति |
पंचप्राण जीवे - भावे ओवाळू आरती ||१||
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा |
दोन्ही कर जोडोनि चरणी ठेविला माथा ||२||
काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती |
कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती ||३||
राही रखुमाबाई दोन्ही उभ्या दो बाही
मयुरपिच्छ चामरे ढाळीती ठाईच्या ठाई ||४||
विटेसहित पाऊले जीवे भावे ओवाळू |
कोटी रवी - शशी जैसे दिव्य उगवले हेळू ||५||
तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा |
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ||६||[७]
सत्त्व-रज-तमात्मक काकडा केला|
भक्ति स्नेहे युक्त ज्ञानाग्नीवर चेतविला||[७]  अशा -काकडा आरती बरोबर भजन स्तोत्रे व अन्य आरत्या तसेच भक्ती गीते ही म्हटली जात होती. पहाटे काकडा आरती व भक्ती गीते स्पीकरवर ऐकून सर्व गावात धार्मिक वातावरण निर्माण होत होते. बुधवारी त्रिपुरा पौर्णिमेला या काकड आरतीच्या महिनाभर उत्सवाचे पहाटे मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी दररोज नित्यनेमाने मंदिरामध्ये सकाळी पूजा आरतीसाठी उपस्थित राहणाऱ्या मार्गदर्शका ह भ प बेबीताई सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला. तत्पूर्वी महिनाभरात हरिपाठ, भजन,एकादशी, पौर्णिमा, श्री तुळशी विवाह, आदी विविध धार्मिक कार्यक्रम  करण्यात आले. येथे मंदिरातील काकड आरती महोत्सव सांगतेला मोठ्या संख्येने महिला भजनी मंडळातील महिला तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments