शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेच्या घरापर्यंत पोहोचवल्या जातील- चिडे,

सत्तेचा महासंग्राम डिजिटल मिडिया 

टाकळीभान प्रतिनिधी- श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर डोमेग्राम येथे  भारतीय जनता पार्टी फलकाचे उद्घाटन अनावरण तालुकाध्यक्ष बाबासाहेब भाऊ चिडे यांच्या हस्ते करण्यात आले ,
    त्यावेळी  चिडे पुढे म्हणाले चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने व शिख धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या डोमेग्राम मधून पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय दादा विखे पाटील व जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, यांच्या मार्गदर्शनाखाल  शासनाच्या विविध योजना जनतेच्या घराघरापर्यंत पोहोचवल्या जातील, कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करावे पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे प्रयत्न करावे, आपली सर्व नेते मंडळी व पक्ष खंबीरपणे आपल्या मागे उभा आहे,
       जिल्हा सचिव नारायण काळे यावेळी म्हणाले, कमलपूर या ठिकाणी पूर्वी बूथ प्रमुख मिळणे अवघड होते, आज या ठिकाणी  शाखेचे उद्घाटन होऊन शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये काम करण्याचा निर्णय  घेतला, ही पक्षाच्या अभिमानाची बाब आहे,
         यावेळी तालुका अध्यक्ष  बाबासाहेब चिडे व पंचायत राज्य जिल्हाध्यक्ष अनिल भानगडे यांनी विजय दवंगे यांची पंचायत राज्य तालुका अध्यक्षपदी  निवडीची घोषणा केली,
     यावेळी पंचायत राज जिल्हाध्यक्ष अनिल भनगडे जिल्हा उपाध्यक्ष संतोष हरगुडे भोकर येथील सरपंच पती प्रताप पटारे, मुकुंद हापसे , राऊसाहेब मुरकुटे, दिगंबर गोरे, अशोक गोरे , बाळासाहेब मुरकुटे ,सुभाष तांदळे, दादासाहेब दवंगे, विलास गुंजाळ, दत्तात्रेय गोरे, भाऊसाहेब गोरडे, दत्तात्रय शेळके, अमोल दवंगे, आदी उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments