दिलीप शिंदे
सोयगाव दि.०३- सोयगाव तालुक्याची जरंडी येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने दि.३१ शुक्रवारी श्री बालाजी मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली.यावेळी ७० रक्तदात्यानी रक्तदान केले. दत्ताजी भाले रक्तपेढी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. अमर सातपुते, प्रशांत चिटणीस,
आजीनाथ भडक,स्वप्निल पवार ,योगेश दहीवाल,राधा गवारे,आरती बामणे,विजय पैठणकर,ज्ञानेश्वर भालेकर,दुर्गा वाघ व सुभाष कदम
यांनी रक्त संकलन केले.
श्री बालाजी मंदिर उपलब्ध करून दिल्या बद्दल गावकऱ्यांनी बालासाहेब संस्थांचे आभार मानले. रक्तदान शिबिर यशस्वितेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.दरम्यान दत्ताजी भाले रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी हुतात्मा स्मारकास भेट देऊन स्मारकाच्या झालेल्या विकासाबद्दल ग्रामपंचायत चे कौतुक केले.
0 Comments