संत ज्ञानेश्वर महाराज -सप्त शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष - भारताचा अध्यात्मिक व पर्यावरनीय वारसा, भारतातील सर्वात पुरातन देववृक्ष सुवर्ण पिंपळाचे कुंभारी येथे कार्तिकी एकादशी ला रोपण--



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.०३ -आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या समाधी मंदिराच्या उजव्या बाजूला दैवी असा  सुवर्ण पिंपळ नावाचा देववृक्ष आहे ,तो भारत भूमीवरील २५०० वर्ष वयाहुन अधिक  व सर्वात प्राचीन वृक्ष असून सदर वृक्ष धनाची देवता  कुबेराने लावला आहे असा संदर्भ स्कंद पुराणात आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आई माता रुख्मिनी यांनी या वृक्षास सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातल्या आहेत.या देववृक्षाच्या फळांचे बीज डॉ.संतोष पाटील यांनी आळंदी येथून संकलन करून त्यापासून रोप बनवून ते आज कुंभारी येथील हनुमान महाराज संस्थानाच्या प्रांगणात प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. संतोष महाराज आळवणे,ग्रामस्थ व भक्तांच्या उपस्थितीत कार्तिकी एकादशीच्या पावन योगावर रोपण करण्यात आले. हें वर्ष संत ज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती( सातशे पन्नासवे) वर्ष आहे.  
   - देववृक्ष महती अभंगातून- जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ l   अंगी ऐसें बळ रेडा बोले ll -संत तुकाराम                                   धन्य इद्रायणी  सोन पिंपळाचा पार l धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी ll--संत नामदेव                                       
  - संत  तुकोबाराय यांच्या-शुद्ध बीजपोटी फळे रसाळ गोमटी  या उक्तीस अनुरूप हे बीज असून पिंपळ हा वृक्ष सर्वाधिक प्राणवायू उत्सर्जन करणारा ,तापमान रोधक औषधी गुणधर्म असलेला वृक्ष आहें. डॉ.पाटील यांनी आजवर राज्यात या देव वृक्षाचे शेकडो वृक्ष लाऊन ते वाढीस लावले आहे.  
       ---- पिंपळाची पर्यावरनातील "स्वर्नीम"  भूमिका-- पिंपळाची फळे खाणारे पक्षी--हळद्या,तांबट,हरोळी,किरपोपट,राखी धनेश, लालबुड्या व शिपाई बुलबुल आदी २२ प्रकारचे पक्षी.                      
-- घरटी  करणारे - काळी शराटी,रात बगळा, गाय कावळा,डोमकावळा, आयबीस, ई  १५ प्रकारचे पक्षी व इतर वन्यजीवांना अधिवास असणारा वृक्ष असून ,हजारो वन्यजीवांच्या अन्नासाठी पंगती यावर बसतील व जैवविविधता वाढीस लागावी हा हेतू यामागे आहे.
          
                             डॉ.संतोष पाटील
             पर्यावरण संवर्धक,अभिनव प्रतिष्ठान, सोयगाव - सिल्लोड.

Post a Comment

0 Comments