महिलांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा : महेश अबूज



सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)

टाकळीभान प्रतिनिधी : महिला आर्थिक
विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, त्याचा लाभ महिला बचत गटांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे राहुरी येथील व्यवस्थापक महेश अबुज यांनी केले.
      जिल्हा नियोजन समिती व महिला आर्थिक विकास महामंडळअंतर्गत प्रतिभा लोकसंचलित साधन केंद्र, राहुरी यांच्या मार्फत ज्ञानेश्वरी महिला बचत गट,टाकळीभान यांना फुड प्रोसेसिंग
युनिट देण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना अबुज बोलत होते. सदर युनिटची एकूण किंमत १ लाख २८ हजार रुपये असून त्यापैकी ९० टक्के अनुदानावर(सबसिडी) गटाला देण्यात आले. व्यवस्थापक महेश अबुज यांच्या हस्ते आणि टाकळीभान येथील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गटाला हे साहित्य युनिट प्रदान करण्यात आले.
    यावेळी अबुज म्हणाले, महिला बचत गटांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबन प्राप्त करावे. म हामंडळाचे उद्दिष्ट म्हणजे महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे आणि आत्मनिर्भर बनविणे आहे.
      या कार्यक्रमाला अक्षय थोरात, भाजप जिल्हा सचिव नारायण काळे, भाजप तालुका उपाध्यक्ष मुकुंद हापसे,  अविनाश लोखंडे ,तसेच ज्ञानेश्वरी महिला बचत गटाच्या मंगल जाधव , अनिता लोखंडे, सुनिता शिरसाठ, मंदा गांगुर्डे,मोना जगताप ,सुरेखा माने, येवले ताई , साळुंके ताई,सर्व लाभधारक महिला उपस्थित.

Post a Comment

0 Comments