लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी

सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)

टाकळीभान(प्रतिनिधी)—लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल व श्रीरामपूर पोलीस स्टेशन तर्फे रन फाॅर युनिटी या दौड महौत्सवात मॅरेथाॅन स्पर्धेचे शुक्रवार दि.३१ रोजी आयोजन  करण्यात आले.
 यावेळी पोलीस कर्मचार्‍यांसह नागरीकांनी मोठ्या संख्येने या मॅरेथाॅनमध्ये उर्त्स्फूतपणे सहभाग नोंदविला. 
यावेळी पोलीस स्टेशनसमोरील चौफूल्यावरून सकाळी ८ वा. टाकळीभान येथील वाडगाव रस्त्याने साई बाबा मंदीर व पुन्हा स्टॅंड पर्यंत मॅरेथाॅन स्पर्धा पार पडली.

 याप्रसंगी तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी, शालेय विद्यार्थी, पत्रकार व ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदविला. जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पो.नि. अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॅरेथाॅन स्पर्धा पार पडली.

Post a Comment

0 Comments