सत्तेचा महासंग्राम ( डिजिटल मिडिया)
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, दरवर्षीप्रमाणे श्री संत ब्रह्मलीन नारायण गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र आळंदी देवाची अशा दिंडीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ह भ प संजयजी महाराज जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी पाच नोव्हेंबर 2025 रोजी श्रीक्षेत्र भऊर येथून आळंदी कडे प्रस्थान करणार असून पिंपळवाडी तालुका राहाता येथे या दिंडीचा पहिला मुक्काम राहणार आहे. त्यानंतर सहा नोव्हेंबर रोजी निमगाव जाळी तर सात नोव्हेंबर रोजी पानोडी तालुका संगमनेर तर दि.8 नोव्हेंबर रोजी बेरेवाडी तालुका संगमनेर येथे मुक्काम राहणार असून दि. नऊ नोव्हेंबर 2025 रोजी संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे या दिंडीचा मुक्काम असणार आहे. दहा नोव्हेंबर 2025 रोजी आळेफाटा तालुका जुन्नर येथे सायंकाळी दिंडी पोहोचून तेथे मुक्काम होणार आहे. 11 नोव्हेंबर रोजी वारूळवाडी नारायणगाव तालुका जुन्नर येथे तर 12 नोव्हेंबर रोजी पेठ तालुका आंबेगाव येथे मुक्काम असणार आहे. 13 नोव्हेंबर रोजी वाकी बुद्रुक तालुका राजगुरुनगर येथे मुक्काम असून 14 नोव्हेंबर 2025 रोजी दिंडी आळंदी देवाची येथे पोहोचणार आहे. 15 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर आळंदी देवाची येथेच मुक्काम असणार असून दिंडी विसाव्याचे येथील ठिकाण न्यू पेठकर धर्मशाळा, इंद्रायणी गार्डन, आळंदी देवाची येथे आहे. या दिंडीचे पाच नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र भऊर येथील श्री रोकडेश्वर हनुमान महाराज मंदिर येथून वेळेवर प्रस्थान होणार आहे. दिंडीत येणाऱ्या वारकऱ्यांनी बिछाना बरोबर घ्यावा. मौल्यवान वस्तू बरोबर घेऊ नयेत. दिंडीत जीवित व वित्तहानी झाल्यास त्याच दिंडी आयोजक जबाबदार राहणार नाहीत. 15 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सात ते आठ या वेळेत आळंदी देवाची येथे दिंडी विसाव्याचे ठिकाणी प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजयजी महाराज जगताप. . भऊरकर यांचे कीर्तन होणार असून 16 नोव्हेंबर 2025 रोजी येथे सकाळी आठ ते दहा या वेळेत त्यांचेच काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर एडवोकेट प्रमोददादा मुरलीधर जगताप. भऊर तालुका वैजापूर यांच्या वतीने येथे महाप्रसादाची पंगत देण्यात येणार आहे. तरी वारकरी भाविकांनी दिंडीत मोठ्या संख्येने सामील व्हावे व वेळेत दिंडी प्रस्थान ठिकाणी यावे .असे आवाहन ह भ प संजयजी महाराज जगताप यांनी केले आहे .
0 Comments