सावळीविहीर येथे बालाजी किराणा स्टोअर्स मध्ये धाडसी चोरी! चार लाख रुपये व दोन सोन्याच्या बांगड्यां लंपास!

शिर्डी (प्रतिनिधी) राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील नगर मनमाड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अमित डोशी यांचे बालाजी किराणा स्टोअर्स येथे मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश करून चार लाख रुपये रोख आणि सोन्याच्या दोन बांगड्या आदींसह मालमत्ता चोरून नेली असल्याची प्राथमिक तपासात माहिती होत आहे. असे समजते.या घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. 
या संदर्भात अधिक माहिती अशी की, राहता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक येथे नगर मनमाड हायवे च्या लगत अमित डोशी यांचे बालाजी किराणा स्टोअर्स असून हे होलसेल व किरकोळ असे मोठे किराणा दुकान आहे. सध्या दीपावली सण जवळ येत असल्यामुळे येथे भरपूर किराणामाल भरून ठेवलेला होता. त्याचप्रमाणे गुरुवारी रात्री सर्वजण झोपलेले असताना अज्ञात चोरटे पाठीमागून भिंतीवर चढून दुसऱ्या मजल्यावर जाऊन घरात प्रवेश केला. घरातील चार लाख रुपये व दोन सोन्याच्या बांगड्या चोरीस गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असून अजूनही तपास सुरू आहे. शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भरती यांनी पोलीस पथकांसह सावळीविहीर येथील बालाजी किराणा स्टोअर्स येथे भेट दिली. येथे श्वानपथकासही पाचरण करण्यात आले होते. घरामध्ये सीसी टीव्ही कॅमेरे सुरू असल्यामुळे अज्ञात चोरटे या कॅमेरात कैद झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. येथे गावात रात्रीची पोलिसांची गस्त वाढविण्यात येईल असे यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांनी सांगितले आहे. ऐन दीपावलीच्या काळामध्ये ही मोठी व धाडसी चोरी झाल्यामुळे अनेक व्यापारी व दुकानदारांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. गावात इतर काही ठिकाणीही चोरी करण्याचा या चोरट्यांनी प्रयत्न केल्याची चर्चा येथे सुरू आहे. दरम्यान पोलीस कसोशीने तपास करत असून लवकरच या चोरट्यांना पकडण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments