लोहार समाज कार्यकर्ता सभा जिल्हा अहिल्यानगर उत्साहात पार पडली

सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)

टाकळीभान प्रतिनिधी- अखिल लोहार गाडीलोहार समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि 12.10.2025 रोजी ॐ चैतन्य फर्निचर शेम्बी रोड एम आय डी सी अहिल्यानगर येथे लोहार समाज कार्यकर्ता सभा जिल्हा अहिल्यानगर उत्साहात पार पडली.
     प्रथमता श्री विश्वाकर्मा पूजन केले.सभेचे कामकाज श्री अशोक पोपळघट यांचे अध्यक्षतेखाली पार पडले. त्यांनतर  सुधाकर हारेर यांनी सर्वांचे स्वागत करून सभा संदर्भात माहिती दिली. त्यांनतर  दिलीप वसव लोहार यांनी संस्था कार्याचा आढावा,संस्था ऑडिट, चेंज रिपोर्ट,वार्षिक अहवाल,आपल्याला मिळालेले आरक्षण व एस टी आरक्षण बाबत, होणारा भटके विमुक्त यांचा पुणे येथे होणारा क्रांती मोर्चा व त्यासाठी प्रत्येकाने हजर रहाणायाविषयी आहावन केले, येणाऱ्या अडचणी, संस्था बळकटी साठी, संघटत्मक पदाधिकारी जबाबदाऱ्या,बदल व वाढीसाठी बाबत ची माहिती दिली.
त्यांनतर बऱ्याचजणांनी समाज्यात काम करत असताना येणाऱ्या अडचणी समस्या, समाज्यातील समस्या, विविध ठिकाणी बांधव भगिनीवर होणारे अत्याचार, नाहक त्रास बाबत,पदाधिकारी कार्यकर्ते बांधव भगिनींची उपस्थिती, आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित होणेबाबतचे प्रयत्न,त्यात आपल्या लोहार समाज्याचे प्रश्न, इतर प्रलंबित मागण्या बाबत पत्रव्यवहार व पाठपुरावा यावर चर्चा विनिमय केल्या.
त्यात महाराष्टतील प्रत्येक जिल्हानिहाय संघटनात्मक बांधणी,समाज एकत्रिकरणसाठीचे प्रयत्न,अहिल्यानगर जिल्ह्यात एकादे समाज भवन बांधणे बाबत,लग्न ठरविणे व करणे बाबत समाज्यात बरीच फसवणूक होते आहे,कोर्ट कचेरी होते आहे,विनाकारण मोठेपणा, आर्थिक खर्च, यासाठी समाज्यात आचारसंहिता असावी, कुठेतरी दोन्ही कुटुंबाकडून त्यासाठी लिखापडी करार करावा यावर चर्चा होऊन नक्की केले. पुढील एक दोन महिन्यात कार्यक्रम घेण्याचे नियोजन यावर ही चर्चा होऊन नक्की केले.
तसेच आपल्या लोहार समाज्यातील महत्वाचा विषय,एकमेकांचे वादविवाद, घरगुती, लग्नानंन्तरचे प्रश्न, तंटे,हे तंटामुक्ती समिती सभा माध्यमातून सोडविले जातात, त्यातुन आपला वेळ, पैसा, कोर्ट कचेरी, पोलीस यांचा, मानसिक, भावनिक त्रास कमी होतो आहे. त्यासाठी समाज्यातील विविध संघटना, पदाधिकारी कार्यकते, वकील, पोलीस खाते, पत्रकार इत्यादी क्षेत्रातील अनुभवी लोकांनी यात, एक समाज्याचे, पुण्याचे कार्य म्हणून आपला बहुमूल्य वेळ देऊन सहभागी होण्याचे आवाहन केले.तसेच प्रत्येक जिल्ह्यात अशी तंटामुक्ती समिती सभा व्हाव्यात असे आवाहन केले.यामुळे समाज्यात शांतता व एकमेकांमधील तेढ कमी होण्याचा प्रयत्न होईल.
त्यात श्री गणेश भालके,विजय मस्के, सुधाकर हारेर, दत्ता कोसे, चंद्रशेखर सोनवणे, रेवन्नाथ गाडेकर, पंडित सोनवणे, रामलिंग कांबळे, संभाजी सोनवणे, लक्ष्मण वाघ,विकास गाडेकर, भाऊसाहेब जवणे, दीपक अंकुश, दीपक थोरात, शिवांद वाघ, प्रसाद थोरात इत्यादीनी भाग घेऊन अगदी मनमोकळे पणाने चर्चा केल्या.
   शेवटी सभा अध्यक्ष श्री अशोक पोपळघट यांनी मार्गदर्शन केले. श्री दिलीप वसव लोहार यांनी आभार मानले.सभा संपली जाहीर केले.
सभेचे व चहा नाष्ट्याचे नियोजन श्री अशोक पोपळघट व त्यांचे कुटुंबीय, टीमने केले होते.लोहार समाज कार्यकर्ता सभा जिल्हा अहिल्यानगर उत्साहात पार पडली

Post a Comment

0 Comments