निमखेडी पाझर तलावाचा सांडवा फुटल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान, तत्काळ मदत मिळावी शेतकऱ्याची आर्त हाक!-



दिलीप शिंदे 
सोयगाव दि.०४- जरंडी मंडळात जरंडी सह निमखेडी  शिवारात १५ दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटी च्या पावसाने निमखेडी पाझर तलावाचा सांडवा फुटला मुळे सांडव्याचे पुराचे पाणी थेट शेतात शिरल्याने तब्बल निमखेडी शिवारातील सहाशे एकरवर कपाशीची पिके वाहून गेली तर काही शेतकऱ्यांची पिके जमीनसह खरडून वाहून गेल्या मोठे नुकसान झाले होते. निमखेडी येथील शेतकरी बाबाजी धनसिंग परदेशी या निमखेडी येथील शेतकऱ्याने शासनाने तात्काळ मदत करावी अशी आर्त हाक दिली आहे.
       याबाबत सविस्तर माहिती अशी, १५ सप्टेंबरला सोयगाव तालुक्यातील निमखेडी ,घोसला परिसरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे निमखेडी येथील पाझर तलावाचा सांडवा फुटल्याने सहाशे एकर वरील पिके वाहून गेली तर काही शेतकऱ्यांची पिकांसह जमीन खरडून वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले होते. बाबाजी धनसिंग परदेशी यांच्या निमखेडी शिवारातील गट क्रमांक १०६ मधील तीन हेक्टर ८० आर व अनिताबाई बाबाजी परदेशी यांच्या गट क्रमांक ३३ मधील  ७१ आर शेत जमीन पिकांसह खरडून वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.हाती येणारे पिक व शेत जमीन खरडून वाहून गेल्याने कायमची भाकरी निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले होते. शेतीची परिस्थिती पाहून योग्य ती मदत मिळावी अशी आर्त हाक बाबाजी परदेशी या शेतकऱ्याने सरकारला दिली आहे. सरकार शेतकऱ्यांचे अश्रू कसे पुसणार व त्यांना कसा आधार देणार हे मात्र अद्यापतरी निरुत्तरित आहे.

Post a Comment

0 Comments