लोणी(वार्ताहर): ज्ञानेश्वर साबळे राहता तालुक्यातील लोणी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका कविता तळोले यांना आदर्श कामाबद्दल राहाता लायन्स क्लबच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
शिक्षिका कविता ह्या जिल्हा परिषदेच्या लोणी खुर्द येथील इरिगेशन बांगला येथे कार्यरत आहेत.शाळेतील विविध उपक्रमाद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले.विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विविध खेळ, विविध सण शाळेत साजरे करणे ,गणिती खेळ,भाषिक खेळ ,वृक्षारोपण ,बचत बँक उपक्रम, पाढे पाठांतर उपक्रम ,शाळेत झालेला बदल, मातीकाम ,कागद काम असे अनेक उपक्रम त्यांनी शाळेत राबवले आहेत . सांस्कृतिक स्पर्धेच्या नाटिकेसाठी त्यांना लोणी केंद्रात प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता.शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कदम यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले . यशाचे श्रेय त्यांनी संभाजी पवार ,विद्यार्थी व पालक यांना दिले.
कविता यांची एफएम रेडिओ नगर येथे मुलाखत ही प्रसिद्ध झालेली आहे. विनोबा ॲप तर्फे जिल्हास्तरीय निवडीतून त्यांची मुलाखत घेण्यात आली आहे तसेच जिल्हा परिषद व एल एफ इ टीम यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आयसीटीसी कोर्समध्ये त्यांनी विशेष यश संपादन केले आहे. त्यात त्यांना लॅपटॉप देऊन गौरविण्यात आले . शिक्षकांनी जबाबदार नागरिक घडवण्याचे पवित्र कार्य आपल्या हातून घडण्यासाठी स्वतःला नेहमी अदययावत ठेवले पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर दिली.जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी,सहकारी शिक्षक आणि कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा यामुळे अपेक्षित काम करू शकल्याची भावना त्यांनी व्यक्त केेले.
0 Comments