श्रीरामपूर प्रतिनिधी
श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपुर येथील आदिवासी भिल्ल तरुण रवींद्र मोरे याला त्याच गावातील कैलास अण्णासाहेब औताडे याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. व महिलांना शिवीगाळ करून दमबाजी केली. एवढी गंभीर घटना घडली असतानाही पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नाही उलट तक्रार द्यायला आलेल्या येथील आदिवासी महिलांना पोलीस स्टेशन मधून घरी पाठवले घटनेची माहिती मिळताच एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रिय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी विभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा दिला.
त्यानंतर मोठ्या संख्येने आदिवासी महिला व पुरुष तालुका पोलीस स्टेशन श्रीरामपूर येथे जमा झाले त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ सूत्रे फिरली व पोलिसांनी साखर कामगार हॉस्पिटल मध्ये जाऊन मारहाण झालेल्या आदिवासी तरुणाची फिर्याद घेऊन कैलास अण्णासाहेब औताडे याच्यावर गुन्हा दाखल केला. रवींद्र उत्तम मोरे यांच्या फिर्यादी वरून आरोपी कैलास अण्णासाहेब आवताडे याच्यावर भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस)२०२३ नुसार कलम ११८(२),११८(१),३५२,३५१(२),३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या वेळी एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर आहिरे, टंट्या तात्या क्रांति फोर्सचे अध्यक्ष बालासाहेब गांगुर्डे, पप्पू मोरे, सुनील मोरे, विशाल मोर ,संतोष मोरे, प्रकाश मोरे, शोभा पवार, गणेश मोरे,विकास मोरे, सोन्याबापू मोरे, ज्योती मोरे, सुनीता पवार, कांता निकम ,गिरजा मोरे,मीनाताई मोरे, चंद्रकला मोरे, मीनाताई सोनवणे,मीराबाई बर्डे,संगीता मोरे,रेखा मोरे, अनीता मोरे, सुवर्णा मोरे, चंद्रकला मोरे, छाया गायकवाड,चंद्रकला मोरे,आदि महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासींनी आंदोलनाचा इशारा देताच भिल्ल तरुणाला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल.
0 Comments