शिर्डी (राजकुमार गडकरी)- अहिल्यानगर जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत सोमैया विद्या मंदिर लक्ष्मीवाडी  या विद्यालयातील 14 वर्ष वयोगटातील मुलींनी अजिंक्यपद मिळवले असून या  खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा  विभाग आयोजित जिल्हा स्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा 9 ते 10 ऑक्टोबर 2025 या कालावधीत, सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडी येथे उत्साहाच्या आनंदमय वातावरणामध्ये पार पडल्या.या स्पर्धेत सोमैया विद्याविहार मुंबई संचलित सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडीच्या 14  वर्षाखालील मुलींच्या संघाने  संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात अजिंक्यपद पटकाविले आहे या संघात माने सायली, कचवे रिता, होन राजेश्वरी,जांभूळकर श्रद्धा या खेळाडू आहेत हा विजयी संघ पुणे विभागीय शालेय  टेबल टेनिस स्पर्धेत संपूर्ण अहिल्यानगर जिल्हयाचे नेतृत्व करणार आहे. 19 वर्षाखालील मुलींच्या संघानेही तृतीय क्रमांक मिळविला आहे. इंगळे अक्षरा,साबळे समृद्धी,रुपवते प्रज्योत, टिपेंद्र यादव, यांचीदेखील पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री संजय अमोलिक आणि बॅडमिंटन कोच श्रीमती रूपाली टेके यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय समीर सोमैय्या सर,क्रीडा अकादमी चे प्रमुख  एझाझ सर,आदित्य सर, स्थानिक शाळा समितीचे सेक्रेटरी मा. सुहास गोडगे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मारुती  धायतडक,क्रीडा समन्वयक रोहन शिंदे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व पालक वर्गांमधून आजी-माजी विद्यार्थ्यांमधून यशस्वी खेळाडूंचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.