दिलीप शिंदे
सोयगाव दि.१४- संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने १३ ते १७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान देशभरात साजरा करण्यात येणारा हृदय-पल्मोनरी पुनरुत्थान (सीपीआर) जागरूकता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पवार तर प्रमुख उपस्थित म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आर के बारोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयांमध्ये सीपीआर कसा द्यावा याबद्दल विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आली. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना अचानक उद्भवलेल्या आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापनामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवा असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे कनिष्ठ विभाग प्रमुख डॉ. उल्हास पाटील, डॉ. रमेश अवताडे, प्रा. किशोर नाले, डॉ. शत्रुघ्नं भोरे, डॉ. निलेश गाडेकर, डॉ. सैराज तडवी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पंकज गावीत, डॉ.सुनील चौधरे महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश गावडे यांनी केले तर डॉ. सुनील चौधरे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
0 Comments