नेहमी मजबूत आणि युनिक पासवर्ड वापरून सायबर हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करा- प्रा.दिलीप खंडागळे



टाकळीभान प्रतिनिधी -  नेहमी मजबूत आणि युनिक पासवर्ड वापरुन सायबर हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करा असे प्रतिपादन अशोकनगर येथील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.दिलीप खंडागळे यांनी बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "सायबर सुरक्षा" या कार्यक्रमात ते बोलत होते.
    ते पुढे असेही म्हणाले की, फिशिंग पासून सावध रहा. संशयास्पद ई-मेल आणि लिंक वर क्लिक करू नका. अँटिव्हायरस वापरा आपल्या डिवाइसवर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा व ते अपडेट ठेवा. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी सांगितले की, सुरक्षित ऑनलाईन सवयी बाळगा. ऑनलाईन खरेदी किंवा डिजिटल पेमेंट करताना सावधगिरी बाळगा.सायबर धोक्यांबद्दल जागृत रहा आणि सुरक्षित सवयींचे पालन करा. नेटवर्क सुरक्षा, माहिती सुरक्षा, क्लाऊड सुरक्षा, आयओटी सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे डेटा संरक्षित राहतो. सायबर सुरक्षा सिस्टीम, नेटवर्क, प्रोग्राम्स आणि डेटाचे सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी तंत्रज्ञान अवगत करणे अतिशय महत्त्वाचे आहे .संवेदनशील माहितीची चोरी किंवा फसवणुकीपासून बचाव करणे महत्त्वाचे बनले आहे असेही त्या म्हणाल्या.
   यावेळी व्यासपीठावर वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.प्रकाश देशपांडे, डॉ. अशोक माने, डॉ .विनायक काळे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.चंद्रकांत कोतकर यांनी केले तर सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.रुपाली उंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments