अहिल्यानगर येथे परत कबड्डी सामना खेळवण्यात यावा ,अन्यथा 16 ऑक्टोबरला टाकळीभानला रस्ता रोखो,




टाकळीभान प्रतिनिधी-१७ वर्ष  गट शालेय जिल्हास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा २०२५ कर्जत येथे झालेला न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पा.पटारे कनिष्ठ महा.विद्या. विरुध्द समर्थ माध्यमिक विद्यालय कर्जत हा कबड्डी चा सामना पुन्हा घेण्यात यावा यासाठी टाकळीभान येथे 16 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता श्रीरामपूर- नेवासा राजमार्गावर  रस्ता रोको करण्याचा इशारा शालेय विद्यार्थी,कबड्डी खेळाडू व समस्त ग्रामस्थ टाकळीभान त्यांनी दिला आहे,

      शुक्रवार ३ आॅक्टोबर २०२५ रोजी समर्थ माध्यमिक विद्यालय कर्जत या ठिकाणी १७ वर्ष गट शालेय जिल्हास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा २०२५ सामने आयोजीत केलेले होते,या स्पर्धेत अंतिम सामना हा न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पा.पटारे कनिष्ठ महा.विद्या.टाकळीभान विरुध्द समर्थ माध्यमिक विद्यालय कर्जत हा सामना सुरु होता, टाकळीभान संघ- २३ गुणावर व कर्जत संघ- २१ गुणावर असताना टाकळीभान चा संघ हा २ गुणानी आघाडीवर असताना,कर्जत संघातील खेळाडूची टाकळीभान संघाने पकड केली आपण सामना हारणार असे लक्षात येताच समोरील संघाच्या बाहेरील लोकांनी व कैलास जगदाळे नामक व्यक्तींने तसेच त्यांच्या सोबत आलेल्या लोकांनी खेळाडूंना जबर मारहाण केली यात दोन खेळाडू गंभीर जखमी झाले असून मारहाण व गोंधळ पाहुन इतर खेळाडू धास्तावले व मानसिक दुष्ट्या खचले उर्वरित सामना इथे खेळलो तर आपल्याला पुन्हा मारतील या भीतीने कबड्डी खेळाडू सामना खेळण्यास तयार होईना, क्रीडा शिक्षक व पालकांनी सदर सामना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे खेळवण्यात यावा असा अर्ज आयोजकांना व तेथील स्थानिक क्रीडा अधिकारी मा.श्री.भाऊराव वीर साहेब यांना दिले परंतु त्यांनी सामना इथेच खेळावा लागेल असा अट्टाहास धरला खेळाडू गांभीर जखमी असताना व स्थानिक लोकांनी गोंधळ घातला असताना सदरील सामना तिथे खेळवण धोक्याचं होत  म्हणून वारंवार सामना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे खेळवण्यास त्यांनी विरोध केला व टाकळीभान संघ २ गुणांनी आघाडीवर असतानी ही अधिकाऱ्यांनी मनमानी व अधिकाराचा गैरवापर करत टाकळीभान संघ बाद करून कर्जत संघ विजयी घोषित केला,यामागे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.ज्ञानेश्वर खुरंगे हेच असून समर्थ माध्यामिक विद्यालय,कर्जत संघात जिल्हा क्रीडा अधिकारी मा.श्री.ज्ञानेश्वर खुरंगे यांचे पुतणे चि.आशितोष दादा खुरंगे व चि.यशराज नामदेव खुरंगे हे २ पुतणे संघात होते,जिल्हा क्रीडा अधिकारी .ज्ञानेश्वर खुरंगे हे मु.पो.खुरंगेवाडी ता.कर्जत येथील आहे. १४ वयोगट व १९ वयोगटातील कबड्डी सामने हे राहता तालुक्यात घेतले असून मग १७ वयोगटातील सामने हे कर्जत या ठिकाणी घेण्यामागे जिल्हा क्रीडा अधिकारी .ज्ञानेश्वर खुरंगे यांचा मुळ हेतू हा होता की जिल्हा क्रीडा अधिकारी .ज्ञानेश्वर खुरंगे यांच्या पुतण्यांना फायदा व्हावा,व आपल्या तालुक्यातील संघ व २ पुतणे ही १७ वर्ष वयोगटातील विभागीय स्पर्धेत खेळावे यासाठी जाणीव पूर्वक रचलेले षंडयंत्र आहे.क्रीडा अधिकारी .भाऊराव वीर यांनीही जिल्हा क्रीडा अधिकारी .ज्ञानेश्वर खुरंगे यांच्या दबावामूळे चुकीचा अहवाल दिला असून,गुणवंत खेळाडूंवर अन्याय करण्याचे काम या दोघांनी केले असून कबड्डी खेळाडूंना मारहाणा झाल्याची तक्रारपोलीस स्टेशन,कर्जत येथे तक्रार देण्यात आली आहे. तरी गुणवंत खेळाडूचे नूकसान होऊ नये यासाठी न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पा.पटारे कनिष्ठ महा.विद्यालय टाकळीभान व समर्थ माध्यामिक विद्यालय,कर्जत हा कबड्डी सामना जिल्हा अहिल्यानगर येथे इन कॅमेरा खेळवण्यात यावा या मागणीसाठी गुरुवार दिनांक १६ आॅक्टोबर २०२५ रोजी ठिक : १० वाजता श्रीरामपुर - नेवासा या महामार्गावर लोकशाही च्या मार्गाने रास्ता - रोखो आंदोलन करण्यात येणार असून,सदर दिवशी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे व क्रीडा अधिकारी.भाऊराव विर हे उपस्थितीत न राहिल्यास तद्नंतर जर काही अनूचित प्रकार घडल्यास व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यांला सर्वस्वी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.ज्ञानेश्वर खुरंगे व क्रीडा अधिकारी.
भाऊराव विर हेच जबाबदार राहील यांची नोंद घ्यावी, निवेदनात म्हटले आहे,
    अशा आशयाचे निवेदन ना,राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील जलसंपदा मंत्री,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहिल्यानगर .ना,माणिकराव शिवाजीराव कोकाटे 
क्रीडा मंत्री,महाराष्ट्र राज्य .खासदार,भाऊसाहेब राजाराम वाघचौरे ,आमदार.हेमंत भुंगजराव ओगले 
 क्रीडा व युवक संचनालय बालेवाडी,पुणे,.जिल्हाधिकारी  अहिल्यानगर,अप्पर पोलीस अधीक्षक ,
श्रीरामपुर यांना देण्यात आले आहे,

Post a Comment

0 Comments