आंतरराष्ट्रीय स्क्वॅश दिन सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडी येथे उत्साह, आनंद आणि प्रसन्न वातावरणात साजरा!

शिर्डी (राजकुमार गडकरी)- आंतरराष्ट्रीय स्क्वॅश दिन सोमैया विद्याविहार, मुंबई ,व सोमैया स्पोर्ट्स अकॅडमी, मुंबई आणि सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच उत्साह, आनंद आणि प्रसन्न वातावरणात राहता तालुक्यातील लक्ष्मीवाडी येथील सोमैय्या विद्यामंदिर येथे साजरा करण्यात आला.
या विशेष दिनाचे आयोजन करण्याची कल्पना आणि संकल्पना स्क्वॅश मुख्य प्रशिक्षक  राहुल पवार यांनी मांडली होती, तर या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन क्रीडा समन्वयक  रोहन शिंदे यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे शक्य झाले.
या उत्सवात सोमैया विद्यामंदिर लक्ष्मीवाडी, सोमैया विद्यामंदिर साकरवाडी आणि श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी उत्साहाने व खिलाडूवृत्तीने सहभाग घेतला आणि कार्यक्रमाला भव्य यश मिळवून दिले.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सोमैया विद्याविहार मुंबईचे अध्यक्ष  समीर सोमैया यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उभ्या राहिल्या आहेत. त्यांचा हेतू व सततचा पाठिंबा ग्रामीण भागातील गरजू व प्रतिभावान विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्याचा आहे, ज्यामुळे अशा उपक्रमांना प्रेरणा मिळते.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोमैया स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक आझाज खान व सहसंचालक आदित्य सिंग यांच्या सहकार्याने या वर्षीचा आंतरराष्ट्रीय स्क्वॅश दिन अत्यंत उत्साही आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे लागला.
पुरुष गट- विजेते: श्री. गौरव डेंगळे –श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव उपविजेते: श्री. अनिल तेलगट – सोमैया विद्यामंदिर, साकरवाडी तृतीय क्रमांक: श्री. चेतन सांगुळे – सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडी, तसेच
महिला गट विजेत्या: श्रीमती पूजा बागुल – सोमैया विद्यामंदिर, साकरवाडी उपविजेत्या: श्रीमती सविता राहणे – सोमैया विद्यामंदिर, लक्ष्मीवाडी, तृतीय क्रमांक: श्रीमती रेणुका पवार – सोमैया विद्यामंदिर, साकरवाडी तर
मुले गट- आदित्य थोरात रुद्र गालांडे, साईश गायकवाड,व
मुली गट- सायली माने, श्रद्धा साबळे,समृद्धी साबळे, यांचा बक्षीसे पटकावल्याबद्दल सन्मान करण्यात आला.  सर्व सहभागी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना संस्थेच्या व सोमैया विद्यामंदिर लक्ष्मीवाडीच्या वतीने प्रमाणपत्रे आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व उत्साही सहभागाबद्दल एल.एम.सी. सचिव सुहास गोडगे, मुख्याध्यापक मारुती धायतडक, तसेच सर्व संस्थात्मक पदाधिकारी, माजी विद्यार्थी व पालक वर्ग यांच्याकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments