बाळासाहेब जनार्दन जपे पा.हे राहता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक येथील रहिवासी असून सामाजिक शैक्षणिक राजकीय, उद्योग, कला ,क्रीडा सांस्कृतिक ,कृषी ,शासकीय पर्यावरण, वैद्यकीय ,आदी सर्व क्षेत्रांमध्ये त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र यांच्या वतीने त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्कार 2025 साठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता रोटरी क्लब सभागृह गंजमाळ नाशिक या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. बाळासाहेब जनार्दन जपे पा.हे राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील रहिवासी असून ते राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांचे निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपसभापतीपद, तसेच सावळीविहीर बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये सरपंच तसेच सावळी विहीर बुद्रुक सोसायटीत चेअरमन पदही सांभाळलेले आहे. ते रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयात स्थानिक स्कूल कमिटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली असून कोपरगाव येथील के.जे. सोमैय्या महाविद्यालय तेथे ज्युनिअर जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आले होते. विविध क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान असून गावातही सामाजिक कार्य तसेच कोणतेही धर्मिक कार्यक्रम असले तर त्यांचा हिरारीने सहभाग असतो.सर्व क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामधून त्यांचे विविध क्षेत्रांमधून प्रत्यक्ष भेटून, भ्रमणध्वनी द्वारे, सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन होत आहे.
0 Comments