शिर्डी (राजकुमार गडकरी)- आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या श्री. साईबाबांच्या पवित्र शिर्डी मध्ये दीपावली सणाला खूप महत्त्व असून श्री साईबाबांपासून येथे दिपोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.
दिवाळीच्या दिवशी साईबाबांनी पाण्याने दिवे लावले होते. असा श्री साई चरित्रात उल्लेख आहे. त्यामुळे येथे दीपावली मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी दीपावलीच्या पर्वा त शिर्डीमध्ये साई भक्त मोठ्या संख्येने येत असतात .साई दर्शन घेऊन दीपोत्सव साजरा करत असतात. त्यामुळेच साई संस्थान तसेच शिर्डी येथील व्यावसायिक, ग्रामस्थ सर्वच आपल्या दुकानावर, हॉटेलवर,घरावर आकर्षक विद्युत रोषणाई, आकाश कंदीले लावून झगमगाट केला जातो. सध्या दिवाळी सण सुरू झाला असून सर्वत्र शिर्डी शहर या विद्युत रोषणाईने झळाळून गेले आहे. दिवाळीच्या निमित्ताने साईबाबा मंदिरासह परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण शिर्डी या विद्युत रोषणाईने उजाळून निघाल्याचे दिसत आहे.
शिर्डीत साईबाबांनी आपल्या काळात अनेक चमत्कार केले आहेत. त्यातीलच एक चमत्कार म्हणजे दिवाळीच्या दिवसात साईबाबांनी तेलाने नव्हे तर पाण्याने दिवे पेटवले होते. तेव्हापासून शिर्डीत दिवाळीला एक साधारण महत्त्व आहे. शिर्डीत नंदादीप कायम तेवत असतोच. पण दिवाळीत साईबाबा मंदिरामध्ये पारंपरिक पद्धतीने दीपोत्सव ,लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. शिर्डीत दीपावली निमित्ताने साईबाबा मंदिराच्या चार नंबरच्या गेट समोर पांरपरिक पद्धतीने बांबूंनी बनवलेला आकर्षक असा आकाश कंदील लावण्यात आला आहे. साई मंदिरावरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. साईबाबा मंदिर परिसरात देखील ठिकठिकाणी छोटे मोठे रंगीबेरंगी आकाश कंदील लावण्यात आले असून साईबाबा समाधी मंदिर आणि द्वारकमाईमध्येही आकाश कंदीले लावण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर संपूर्ण साईबाबा मंदिरासह द्वारकामाई, गुरुस्थान, चावडी व परिसर येथेही आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.साईबाबांनी आपल्या हयातीत दिवाळीच्या दिवशी ज्या द्वारकामाईमध्ये पाण्याने दिवे पेटवले होते.
0 Comments