जय बजरंग दूध संकलन केंद्र, पिंपरी निर्मळ तर्फे दीपावलीचा आगळे वेगळे भेट पॅकेज देत दूध उत्पादकांच्या खातीवर्ग केले



 लोणी (प्रतिनिधी )साबळे ज्ञानेश्वर,सत्तेचा महासंग्राम न्यूज 


 या दिवाळीला दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी
पिंपरी निर्मळ येथील डॉ. विकास बाळकृष्ण निर्मळ, हे केवळ विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन नाहीत तर जय बजरंगबली दूध संकलन केंद्राचे चालक व संस्थापक देखील आहेत. समाजभावनेतून कार्य करणारे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर राहणारे डॉ. विकास बाळकृष्ण निर्मळ यांनी या दीपावळीला दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आगळंवेगळं भेटपॅकेज उत्पादकांच्या खाती वर्ग केलं आहे.

 दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी!
या वर्षी डेअरी तर्फे प्रति लिटर 1 रुपया आणि स्वतःच्या वतीने 1 रुपया, अशा एकूण प्रति लिटर 2 रुपयांची विशेष रिबीट देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
 यामध्ये एकूण ₹38 लाख इतकी रक्कम दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आली असून, रिबीट अनामत आणि एक पेमेंट असे मिळून ती संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने दीपावळीचा उजेड फुलला आहे.

🌾 शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य — हिच खरी दीपावली!
पत्रकारांशी बोलताना डॉ. विकास बाळकृष्ण निर्मळ म्हणाले,

> “स्वतःचा विचार नंतर, पण उत्पादकांचा विचार आधी — हेच माझं धोरण आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलतो, तेव्हाच मला खऱ्या अर्थाने दीपावली वाटते.”



 डॉ. विकास बाळकृष्ण निर्मळ — शेतकरीहितासाठी समर्पित व्यक्तिमत्व
गोरगरिबांच्या पाठीशी कायम उभे राहणारे, समाजकार्यातून प्रेरणा घेणारे आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सतत झटणारे डॉ. विकास बाळकृष्ण निर्मळ हे आज तरुण पिढीसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जय बजरंग दूध संकलन केंद्राने नेहमीच “शेतकऱ्यांचा विकास, हाच आमचा उत्सव” हा ध्यास जपला आहे.

जय बजरंग दूध संकलन केंद्र, पिंपरी निर्मळ तर्फे सर्व शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
“उत्पादक हसले कीच देश उजळतो — जय बजरंगबली!” 

Post a Comment

0 Comments