शिर्डी जवळील अस्तगाव माथा येथे दि. 12 ते 16 ऑक्टोबर 25 दरम्यान प.पु. प्रदीप मिश्रा यांच्या भव्य शिवमहापुराण कथेचे आयोजन! तयारी पूर्ण!



शिर्डी येथील ही महाशिवपुराण कथा देशात सर्वात मोठी कथा ठरणार --डॉ. सुजय  विखे पा.

शिर्डी (राजकुमार गडकरी)- राहाता तालुक्यातील शिर्डी जवळील अस्तगाव माथा-पिंपरी निर्मळ येथे दिनांक 12 ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत परमपूज्य प्रदीप मिश्रा यांची प्रसिद्ध अशी भव्य दिव्य महाशिवपुराण कथा होणार असून या भव्य कथेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. अशी माहिती मा.खा.डॉक्टर सुजयदादा राधाकृष्णजी विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. 
शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना डॉक्टर सुजय दादा विखे पाटील म्हणाले की, परमपूज्य प्रदीप मिश्रा यांची महाशिवपुराण कथा अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच होत आहे. यापूर्वीच्या महाराष्ट्रातील त्यांच्या दोन कथा  रद्द झाल्यामुळे वैजापूर नंतर शिर्डी राहता येथे ही कथा बऱ्याच दिवसानंतर होत आहे. शिवभक्तांना व भाविकांना ही मोठी पर्वणी आहे. साधारण या महाशिवरांकथेसाठी तीन लाख भाविक येत असतात. मात्र येथे सुमारे आठ लाख भाविकांची व्यवस्था करण्यात आली असून भारतातील सर्वात मोठी महा शिवपुराण कथा येथे होईल अशी अपेक्षा आहे. तशी संपूर्ण तयारी झाली आहे. अस्तगाव माथा येथे नगर मनमाड महामार्गाच्या कडेला भव्य पटांगणात भव्य वॉटरप्रूफ मंडपात ही महापुराण कथा होणार असून  येथे ज्योतिर्लिंग व चारधामचा अति भव्य देखावा करण्यात आला जवळील नगर मनमाड महामार्ग एका बाजूने सुरू राहणार आहे ‌. सुदैवाने जडवाहतूक बाहेरून वळवण्यात आली आहे.यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही. याची दक्षता घेतली जाणार आहे स्वयं सेवक, कार्यकर्ते ,सर्वजण या कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत. दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी प्रदीप मिश्रा महाराजांचे येथे आगमन होणार असून राहता व शिर्डी येथे त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. महाराजांचे लोणी येथे आपल्या निवासस्थानी मुक्काम असणार आहे.बारा ते 16 ऑक्टोबर दरम्यान दुपारी एक ते चार या दरम्यान ही महाशिवपुराण कथा होणार आहे. भारतातील सर्वात मोठी महापुराण कथा येथे यशस्वीपणे करण्याचा हा प्रयत्न असून  शिवभक्त नक्कीच त्यासाठी परिश्रम घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments