टाकळीभान येथील बस स्टँडच्या जागेवरच बस स्टॅन्ड बांधण्यात यावे श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैया बेग,

टाकळीभान: प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील बस स्टँडच्या जागेवरच  बस स्टॅन्ड बांधण्यात यावे या मागणी करता येथील कार्यकर्ते मल्हार रणनवरे यांनी त्या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे त्या उपोषणास भेट देण्यासाठी श्रीराम संघाचे अध्यक्ष  सागर भैया बेग आले होतेत्यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आले असता त्याना सांगितलं
             निवेदनात त्यांनी म्हटले आहे की श्रीरामपूर राज्य मार्ग आमच्या टाकळीभान गावातून जातो. स्टॅन्ड परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत प्रवाशांच्या सोयीसाठी व स्थानक अस्तित्वात होते. परंतु सदर रस्त्याचे रुंदीकरण सुरू असताना बस स्थानक कुठल्याही प्रकारे अडथळा न ठरता ही, त्याचा विनाकारण पाडाव करण्यात आला. व या बस स्टँडच्या जागेत मोठा राजकीय वरदस्त असलेल्या व्यक्तीने या  स्थानकाच्या जागेत गाड्यांचे अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले आहे. सदर प्रकरणामुळे गावातील प्रवासी विद्यार्थी व माता-भगिनी यांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 
उन्हाळा पावसाळा रात्रंदिवस बस स्थानक नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. म्हणून आपण तात्काळ टाकळीभान येथे पूर्वीप्रमाणे बस स्थानक उभारून द्यावे तसेच अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही करावी व केलेल्या कृत्यास अधिकाऱ्याला चौकशी करून त्यावर ही योग्य ती कारवाई करावी या आशयाचे निवेदन राजेंद्र उर्फ मल्हार संजय रणवरे यांने दिले आहे. या निवेदनाच्या प्रती तालुक्याचे आ. हेमंत ओगले, तहसीलदार श्रीरामपूर, पोलीस निरीक्षक श्रीरामपूर यांना देण्यात आल्या आहे.
         श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैया बेग यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना सांगितले की बस स्टॅन्ड हे आहे त्याच जागेवर झाले पाहिजे नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा सज्जड इशारा  देऊन आहे त्या जागेवर बस स्टॅन्ड बांधून देण्यास विनंती केली.

Post a Comment

0 Comments