साईसंस्थान कर्मचारी सोसायटीचे कर्मचारी रमेश वाघे यांनी सापडलेले सोन्याचे मनी प्रामाणिकपणे साईभक्तांला केले परत!

शिर्डी (प्रतिनिधी) सध्याच्या आधुनिक व धकाधकीच्या जीवनामध्ये प्रामाणिकपणा, इमानदारी विसरत चालली  असताना काही ठिकाणी किंवा काही व्यक्तींकडून अजूनही  आपला प्रामाणिकपणा, इमानदारी जपली जात आहे.
 असे अनेक उदाहरणे शिर्डीमध्ये विशेषता साई संस्थांन परिसरात दिसून येत आहे. साई भक्तांचे सापडलेल्या अनेक मौल्यवान वस्तू त्यांना प्रामाणिकपणे परत  देण्याचे काम आतापर्यंत अनेक संस्थान कर्मचारी यांनी केले आहे. ‌. अशीच प्रामाणिकपणाची घटना नुकतीच शिर्डी येथे घडली आहे. शिर्डी येथील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे कर्मचारी श्री. रमेश दगडू वाघे यांना मोबाईल लॉकर जवळ सोन्याचे सात मणी सापडले.
सदर सोन्याचे मणी त्यांनी तत्काळ संरक्षण कार्यालयात जमा केले.सदरचे मणी हे साईभक्त श्री. प्रशांत बंडू चौधरी, राहणार अहमदनगर यांचे असल्याचे ओळख पटले. त्यानंतर या साई भक्तांना त्यांचे सोन्याचे मणी परत करण्यात आले. या प्रामाणिकपणाबद्दल रमेश दगडू वाघे यांचा सुरक्षा अधिकारी श्री भाऊसाहेब जाधव यांनी त्यांचा सत्कार केला. त्याचप्रमाणे या प्रामाणिकपणाबद्दल रमेश वाघे यांचा साई संस्थान अधिकारी कर्मचारी तसेच साई संस्थान कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार व सर्व पदाधिकारी संचालक ,अधिकाऱ्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. व त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments