दारूबंदीसाठी भोकरच्या महिला सरसावल्या, प्रशासनाला आर्त हाक आमदार, तहसिलदार, पोलीस, दारूबंदी व उत्पादन शुल्कसह ग्रामपंचायतीवर ही महिलांचा मोर्चा

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी - साहेब दारू पिणार् यांनी घरात भांडे ठेवले नाही, अंगावर फुटका मनी ठेवला नाही, घरात रूपयाचा आधार नाही,मुलाबाळांच्या शिक्षणावर परीणाम होत आहे.

 कधी कधी त्यांना खांद्यावर उचलून घरी आणावे लागते, काहींनी आत्महत्या केली, काही अपंग झाले, आम्ही जगायचे कसं? अशी आर्त हाक श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, तहसिलदार, तालुका पोलीस ठाणेव दारू बंदी व उत्पादन शुल्क कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयासह सर्वांना भोकरच्या महिलांनी आर्त हाक दिली आहे. 
या व्यसनी पतीराजाला कंटाळलेल्या महिलांनी काल मोचनि जात मोठा आक्रोश केला. भोकरच्या महिला दारूबंदीसाठी सरसावल्याने आता प्रशासन ही जागे झाले असून लागलीच कारवाईला सुरूवात झाली मात्र रिकाम्या बाटल्याशिवाय काहीच हाती लागले नाही तरीही आम्ही याचा पाठपुरावा करणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आठवड्यात दारू बंदी करणार असल्याचे यावेळी आमदार हेमंत ओगले आश्वासन देत प्रशासनाला सुचना दिल्या.

श्रीराम पूर तालुक्यातील भोकर येथे दारूड्याचा सुळसुळाट झाल्याने व या दारूड्याच्या दरोजच्या त्रासाला कंटाळलेल्या महिलांनी काल सोमवार दि. 8 सप्टे बर रोजी प्रारंभी ग्रामसभेत ठराव मांडत, ठराव मंजूर करून चक्क अनेक महिलांनी एकत्र येत प्रथम ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेत आकप्रेश केला, तेथून तालुका पोलीस ठाणे गाठले, त्यानंतर श्रीरामपूर तहसिल कार्यालयात आमदार हेमंत ओगले यांनी जलजीवन व पाणी पुरवठा या विषयावर आयोजीत केलेल्या आम सभेत या महिला मोचनेि दाखल होताच उपस्थीत चक्क झाले. यावेळी अनेक महिलांनी उपस्थीतांसमोर आपल्या करूण कहाण्या मांडल्या. त्यानंतर दारू बंदी व उत्पादन शुल्क कार्यालयावर ही मोर्चाने मुलाबाळासमवेत जात तेथे ही आपल्या व्यथा मांडत प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला.

भोकरच्या सरपंच सौ. शितल पटारे व आशांकूरच्या सिस्टर प्रिस्का या ही या महिला समवेत होत्या. यावेळी दिलेल्या निवेदनात भोकरच्या जिल्हा परीषद शाळेसमोर सुरू असलेली अवैध दारू विक्री व मटका बंद करावा, येथील मटका व दारू बंदी न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर उपोषण करू, व्यसनाधिन मुले, पती व पुरूष घरातील पैशांची चोरी करून जुगार, मटका खेळतात्, दारू पितात. याचा परीणाम शाळकरी मुलावर होत आहे. यामुळे अनेक महिलांचे संसार उध्वस्त झाले, होत आहेत. काहींनी या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्या असल्या ने संतप्त महिलांनी नुकत्याच संपन्न झालेल्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मांडत संमत करवून घेतला. अर्थात अशा प्रकारचे दारू बंदीचे ठराव अनेकदा झाले परंतू त्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. उलट आडबाजूची दारू चौकात आली. आता दारू बंदी झाली नाही तर महिला दारू पिणार् याला मारहाण करतील, त्यांच्यावर छेडछाडीचे गुन्हे दाखल करतील असा इशारा या निवेदनात देण्यात आला.

यावेळी आमदार हेमंत ओगले यांनी एक आठवड्यात संबधीतांवर कारवाई करून गावातील दारूबंदीसाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सुचना तहसिलदारांसह संबधीत विभागांना दिल्या. तुम्ही कायदा हातात घेवू नका, तुम्ही फक्त आम्हाला सहकार्य करा. कायदा सर्वांसाठी सारखाच आहे, संबधीत अवैध विक्रेत्यांवर आम्ही कारवाईकरू पण तरी ही पुन्हा विक्री होताना आढळल्यास आमच्याशी संपर्क साधा, मोबाईलद्वारे व व्हाट्सअप द्वारे कळवा लागलीच कारवाई करू, असे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी सांगताच आज संध्याकाळ पर्यंत त्यांचे डबडे रिकामे झाले पाहीजे अशी आग्रही मागणी यावेळी उपस्थीत महिलांनी केली.

श्रीरामपूर तहसिल कार्यालय येथे निवेदन प्रसंगी आमदार हेमंत ओगले, कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचीन गुजर, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, जिल्हा परीषदेचे बाबासाहेब दिघे, माजी नगरसेवक रितेश रोटे, तहसिलदार मीलींदकुमार वाघ, सरपंच शितल पटारे, उपसरपंच संदिप गांधले, आशांकुरच्यासिस्ट र प्रिस्का, रेखा थोरात, सुनिता आहेर, काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे, प्रताप पटारे, विजय अमोलीक, वेणुनाथ डूकरे, मारूती आहेर, रमेश भालके, अंबादास काकडे, राजू लोखंडे, भाऊसाहेब डूकरे, प्रकाश चौधरी, अतुल आबुज, रामदास ढोकणे, भानुदास शिंदे आदिंसह मान्यवर उपस्थीत होते.

या निवेदनावर साखरबाई शिंदे, शिला अमोलीक, अनिता शिरसाठ, सुशिला सोनावणे, सुनिता थोरात, चंद्रकला म्हसे, उषा बोधक, शबाना शेख, विमल आहेर, ताराबाई पंडीत, पुजा अमोलीक, छाया साळवे, सोनाली चिलघर, कमल अमोलीक, सुमन अमोलीक, मंदा मोरे, शिला अमोलीक, आशा आहेर, चंद्र भागा आहेर, मनिषा अमोलीक, कमल साळवे, आशा चव्हाण, सुनिता आहेर, उषा काळे, सविता दोंड, रेखा बनसोडे, लता आढांगळे, जमुना आहेर, अनिता चाबुकस्वार, शोभा डूकरे, मिना माळी, दिपाली शिंदे, शितल रननौरे संगीता आहेर, उषा मोरे, सुरेखा अमोलीक, कल्पना अमोलीक आदिंसह अनेक महिलांच्यासह्या आहेत.

दरम्यान हे निवेदन पोहताच श्रीरामपूर येथील दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तातडीने लवाजम्यासह भोकर येथे दाखल कारवाई सुरू केली परंतू सकाळपासून येथील महिला प्रशासनाच्या दारात वाजत गाजत गेल्याने सर्वच अवैध विक्रेते सावध झाल्याने येथे दोन गोण्या रिकाम्या बाटल्याशिवाय पोलीसांच्या काहीच हाती लागले नाही. परंतू तरीही ग्रामपंचायत कार्यालयात नोंद करत यापुढे सापळा रचून कारवाई करणार असल्याचे दारूबंदी व उत्पादन शुल्कचे पो. नि. आरबी गायकवाड, पो. कॉ. डीबी पालवे, यु. डी. काळे, महिला पोलीस कॉ. प्रमिला कासार आदि सहभागी झाले होते.

अनेकदा दारूबंदीचे ठराव अन् 28 दारू विक्रेत्यांची यादी

अनेकदा ग्रामसभेत दारू बंदीचे ठराव झाले मात्र पुढील कारवाई झालेली नव्हती परंतू कालच्या ठरावानंतर महिला ही आक्रमक झाल्याने प्रशासनाला ही खडबडून जाग आली. भोकर येथे एकूण 28 अवैध दारू विक्रीचे अड्डे आहेत. या सर्व विक्रेत्यांच्या नावांची यादी संबधीत महिलांनी पोलीसांना दिल्याने आता पोलीस व प्रशासन काय भुमिका घेणार? अन् भोकरची दारूबंदी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोबत फोटो पाठवित आहे.

श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले व तहसिलदार मीलींदकुमार वाघ यांना दारू बंदीसाठीचे निवेदन प्रसंगी सचीन गुजर, करण ससाणे, बाबासाहेब दिघे, रितेश रोटे, मीलींदकुमार वाघ, शितल पटारे, आशांकुरच्या सिस्टर प्रिस्का, रेखा थोरात, सुनिता आहेर आदिंसह महिला दिसत आहेत. (छाया- चंद्रकांत झुरंगे)

तालुका पोलीस ठाण्याचे पो. नि. अरूण धनवडेयांना दारूबंदीसाठीचे निवेदन प्रसंगी शितल पटारे, सिस्टर प्रिस्का, रेखा थोरात, सुनिता आहेर, सुदाम पटारे, प्रताप पटारे, विजय अमोलीक, वेणुनाथ डूकरे, मारूती आहेर, रमेश भालके, अंबादास काकडे, राजू लोखंडे, भाऊसाहेब डूकरे, प्रकाश चौधरी, अतुल आबुज, रामदास ढोकणे, भानुदास शिंदे आदिंसह महिला दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments