टाकळीभान जमीन शर्तभंग प्रकरणी श्रीरामपूर तहसीलदारांचे चौकशीचे आदेश.आदिवासी भिल्ल समाजाचे उपोषण मागे.




श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील शर्तभंग झालेल्या जमिनी पुनरगृहीत करून सदर जमिनी भूमीहीन आदिवासी भिल्ल समाजाला वाटप करा या प्रमुख मागणीसाठी एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी सैनिक संपतराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद येथील स्मशानभूमी परिसरातील लक्ष्मी माता मंदिरासमोर मंगळवार 9 सप्टेंबर रोजी पासून आदिवासी भिल्ल समाजाने बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला होता.

 परंतु श्रीरामपूर तहसीलदारांनी टाकळीभान मंडळधिकारी यांना लेखी आदेश देऊन सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून अहवाल कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चौकशी होईपर्यंत आदिवासी भिल्ल समाजाने आमरण उपोषण मागे घेतले असल्याचे एकलव्य भिल्ल सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी सांगितले. परंतु सदर प्रकरणाची चौकशी होऊन योग्य कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याचे यावेळी उपोषणकर्त्यांनी बोलून दाखवले. उपोषणकर्त्यांनी मागण्या केल्या होत्या की श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील शर्तभंग झालेल्या जमिनी भूमिहीन आदिवासी भिल्ल समाजाला वाटप करा. या जमिनी शर्तीवर वाटप करण्यात आल्या तरी ही ग्राम अधिकारी, मंडळ अधिकारी यांनी फेरफार नोंद केल्या त्यांची चौकशी करून कारवाई करावी तसेच सातबारा वर शर्ती नमूद असताना सुद्धा दुय्यम निबंधक श्रीरामपूर यांनी बनवलेले दस्त कोणत्या अधिकाराने बनवले याची चौकशी करण्यात यावी व शर्तभंग झालेल्या सर्व जमिनी पुनर्गृहीत करून या जमिनी माजी सैनिक, मिलिटरी सैनिक, निमलष्करी सैनिक, व भूमिहीन आदिवासी भिल्ल समाजाला वाटप करावी. अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी यावेळी केल्या आहेत.


 त्यामुळे या प्रकरणात आता नेमकी काय कारवाई होते याकडे संपूर्ण श्रीरामपूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर अहिरे यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली.

Post a Comment

0 Comments