शिर्डीत साई दर्शनामुळे मोठे समाधान व मिळते शांती--राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व मा. क्रिकेटपटू व्ही व्ही एस लक्ष्मण

शिर्डी (प्रतिनिधी) आमचे संपूर्णकुटुंब साईभक्त असून त्यामुळेच माझे नावही वेंकट साई लक्ष्मण असे ठेवले आहे.आपण न चुकता वर्षातून एकदा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतो. 

साईबाबांच्या दर्शनामुळे मनाला खूप समाधान आणि शांती मिळाली .असे माजी क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्ही व्ही एस लक्ष्मण यांनी सांगितले.  राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण  यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतले. साईबाबांच्या दर्शनानंतर साई संस्थानच्या वतीनं त्यांचा मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात यांनी शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला.
 क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी माध्यमांशी  बोलताना सांगितले की "माझे आजी-आजोबा आणि आई-वडील शिर्डी साईबाबांचे परमभक्त आहेत. त्यामुळे आमच्या सर्व भावंडांचे सुरुवातीचे नाव वेंकट साई असे ठेवले गेले. माझेही नाव आजी-आजोबांनी वेंकट साई लक्ष्मण असे ठेवले. मी लहान असल्यापासूनच आजी-आजोबा आणि आई-वडीलांसह शिर्डीला येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेत असतो. साईबाबांची कृपा माझ्यावर आणि कुटुंबीयांवर खूप आहे."मी शिर्डीत नेहमी येतो. दरवेळी आरती करतो . यावेळी साईबाबांच्या दुपारच्या मध्यान्ह आरतीलाही उपस्थिती राहण्याचा मला योग आल्यानं मनाला खूप समाधान आणि शांती मिळाली". असं त्यांनी यावेळी सांगितलं.

Post a Comment

0 Comments