अंध शाळेतील मुलांनी केला शिक्षण दिन साजरा

लोणी ( वार्ताहर)

 लोणी श्रीरामपूर येथे अंधशाळे तील मुलांनी केला शिक्षक दिन साजरा आज पाच सप्टेंबर रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
 संस्था अध्यक्ष ऍडोकेट,बी एफ चुडिवाल यांच्या अध्यक्षतेखाली वढणे सुनिता यांनी सुत्रसंचलन केले.विशेष शिक्षिका नवथर मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले शिक्षक दिनाचे माहिती दिली. सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी स्वागत गीत सादर केले व सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या विषयांवर वर्गात तासिका गायन.वादन.गोषटी अधययन करून शाळेत शिक्षक दिनाचे आयोजन केले उत्तम कामकाज दिवसभरासाठी झाले 
. वर्ग शिक्षक यांनी निरिक्षण केले.भामरे सर व मुख्याध्यापिका सौ आंबेडकर मॅडम यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले व संस्था अध्यक्ष एडॊवोकेट बी एफ चुडिवाल यांनी प्रमुख भाषण केले विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक वर्ग यांना  शुभेच्छा दिल्या व,गुलाब पुष्प देऊन भेट वस्तू दिल्या, प्रसंगी उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थिनी यांना शुभेच्छा दिल्या मिष्टान्न भोजन देऊन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पत्रकार साबळे यांनी शिक्षकांप्रती असलेला आदर मुलांनी मुलांच्या भावनेतून दाखविल्याबद्दल मुलांचे खूप कौतुक केले.

Post a Comment

0 Comments