लोहगाव (वार्ताहर) राहाता तालुक्यातील आदर्शवत म्हणून ओळख असलेल्या लोहगाव विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा सोसायटीची 2024 व 25 या आर्थिक वर्षाची 64 वी सर्वसाधारण सभा सोमवार दि
२९ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरा मध्ये मा.जिल्हा परिषद अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र केरुनाथ पा.चेचरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
अशी माहिती संचालक मंडळाच्या वतीने व्हा. चेअरमन राजेंद्र चंद्रभान पा. चेचरे यांनी दिली.
सोमवार होत असलेल्या वार्षिक सभेत सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सोसायटीचे सचिव आर. व्ही चेचरे पा.यांनी केले आहे.
0 Comments