दिलीप शिंदे
सोयगाव दि.२७- वरसाडा येथील शाळा सुटताच वरसाडा, कवली व बहुलखेडा परिसरात विजेच्या कडकडाट सह जोरदार पावसाची सुरवात झाल्याने कवली व बहुलखेडा येथील १०० विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन पायी घर गाठावे लागल्याचा धक्कादायक प्रकार दि.२७ शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांच्या मुलामुलींनी दर्जेदार शिक्षणाची कास मनाशी बाळगलेल्या १०० विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना चक्क बस अभावी भर पावसात जीव मुठीत घेऊन पायदळी चिखल तुडवीत पाचोरा तालुक्यातील वरसाडा येथे शिक्षणासाठी पायी जावे लागत आहे.हा खळबळजनक प्रकार बहुलखेडा,आणि कवली ता.सोयगाव येथील १०० माध्यमिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या नशिबी आला आहे.सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा आणि कवली ता.सोयगाव येथील १०० विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यानींना माध्यमिक शिक्षणासाठी गावाजवळ व्यवस्था नसल्याने वरसाडे ता.पाचोरा येथील माध्यमिक शाळेत जावे लागते परंतु या दोन्ही गावांमधून शाळेच्या वेळेवर बस सुविधा नसल्याने शाळेला जवळ करण्यासाठी या विद्यार्थ्यांना तब्बल दोन्ही बाजूंनी सहा कि.मी चा पायी प्रवास करावा लागत आहे.बहुलखेडा ते वरसाडे ता.पाचोरा हे अंतर तब्बल दोन्ही बाजूंनी सहा किमी आहे,या मार्गावर शाळेच्या वेळेवर बसची सुविधा नसल्याने या विद्यार्थ्यांच्या नशिबी दोन्ही बाजूंनी पायीच प्रवास आहे.त्यामुळे शिक्षणासाठी भर पावसात जीव मुठीत घेऊन चक्क चिखल तुडवीत पायी प्रवास करून शाळा गाठावी लागत आहे.शाळा सुटल्यानंतर विजेच्या कडकडाट सह सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन घर गाठावे लागल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी दुपारी घडला. विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर येण्या जाण्यासाठी बस नसल्याने गोरगरिब,मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांच्या पाल्यांचा शिक्षणाचा प्रवास कधी सुखर होईल हे मात्र निरुत्तरित आहे.
------सोयगाव तालुक्यात शिक्षण आणि दळणवळणची गैरसोय----
सोयगाव तालुक्यात शिक्षण आणि दळणवळण याबाबत गैरसोय असल्याने शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन पायी प्रवास घडत आहे.याकडे सर्वच यंत्रणांचे दुर्लक्ष होत असून या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेवर बस या रस्त्यावरून धावेल कि नाही याची शाश्वती मात्र लोकप्रतिनिधीही देत नसल्याने या विद्यार्थ्यांना पायीच प्रवास करावा लागणार आहे.
0 Comments