लोहगाव (वार्ताहर): जिल्हा क्रीडा विभाग, अहिल्यानगर यांच्या वतीने वाडिया पार्क, अहिल्यानगर येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलातील कन्या विद्यालयातील विद्यार्थिनी अक्षरा विजय कदम हिने ३२ ते ३५ वजन गटांमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
अक्षरा विजय कदम हिची विभागीय पातळीवर तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अक्षरा हिचा नुकताच प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव व लाईफ वर्कर वाबळे एस.एस. यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
तिच्या या यशाबद्दल स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, एकनाथराव घोगरे, माजी प्राचार्य भीमराव आंधळे, प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्य अलका आहेर, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, प्रभारी पर्यवेक्षिका माधुरी वडघुले, प्रसिद्धी प्रमुख डॉ. शरद दुधाट, संजय ठाकरे, विलास गभाले, बाबासाहेब अंत्रे आदींसह शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थिनीला क्रीडा शिक्षक प्रफुल्लकुमार नव्हाळे यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments