दिल्लीचे भक्त आमितजी कपूर यांनी नुकतीच शिर्डीला भेट दिली. श्री साईबाबांच्या मंदिरात जाऊन त्यांनी साईदर्शनही घेतले. साई दर्शनानंतर शिर्डीमध्ये हॉटेल साई संगीता येथे औपचारिक चर्चा करताना अमितजी कपूर हे बोलत होते. यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजयजी महाराज जगताप ( भऊरकर) व शिर्डीचे घोडेकर साहेब होते. यावेळी त्यांचा हभप संजयजी महाराज जगताप यांचे शुभ हस्ते साई शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी घोडेकर साहेब, पत्रकार राजकुमार गडकरी, सागर जाधव आदी उपस्थित होते. अमितजी कपूर हे नेहमी पंढरपूर व शिर्डीला श्री पांडुरंगाच्या व श्री साई दर्शनासाठी येत असतात. त्यांना मराठी भाषाही थोडी थोडी येते. दिल्ली येथे त्यांच्यासह मित्रपरिवार व साई भक्तांची श्री.साई रसोई हे ट्रस्ट असून त्या मार्फत विविध धार्मिक व सेवाभावी कार्यक्रम ते राबवित असतात. अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारत त्यांनी साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत आल्यानंतर मंदिरात मन साईभक्तीत तल्लीन होऊन जाते. असेच एकदा साई पालखी घेऊन आम्ही सर्व येथे आल्यानंतर येथे मंदिरासमोर भजनामध्ये असेच आम्ही सर्वजण एक -दीड तास देहभान विसरून खूप तल्लीन होऊन गेलो होतो. व ते बाबांच्या कृपेनेच घडले होते. असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. यावेळी ह भ प संजयजी महाराज जगताप यांनी यावेळी म्हटले की, कोरोना काळानंतर प्रत्येकाला या सृष्टीचा चालक-मालक असणाऱ्या ईश्वराचे अधिकाधिक महत्व कळाले असून देशातील प्रत्येक धार्मिक स्थळी भाविकांची गर्दी वाढत आहे. सर्व चराचरात भगवान असून मनोभावे भगवंताची सेवा केली तर नक्कीच आपला हा मनुष्य देह सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही असे सांगत शिर्डी तसेच पंढरपूरला व इतर देवस्थानी पायी दिंडीत जाणाऱ्या भाविकांना मिळणारा आत्मिक आनंद हा खूपच मोठा असतो. असेही यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले.
0 Comments