अनधिकृत गाळे पाडावे व बस स्टँड उभारावे अन्यथा बेमुद उपोषण करणार : रणनवरे,



  टाकळीभान प्रतिनिधी : टाकळीभान येथे असणारे बस स्टँड गरज नसताने पाडण्यात आले असून त्याजागी बस स्टँड बांधण्यात यावे अन्यथा गुरूवार दि.३० सप्टेंबर पासून बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा मल्हार संजय रणनवरे यांनी निवेदनाद्वारे साबाला दिला आहे.
  या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, श्रीरामपूर राज्यमार्ग ५० हा टाकळीभान गावातून जात आहे. या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी बसस्टँड आस्तीत्वात होते. मात्र सदर रस्त्याचे रूंदीकरणाचे काम सुरू असताने   सदर बसस्टँडचा कुठलाही अडथळा नसताने ते विनाकारण पाडण्यात आले. 
सदर प्रकारामुळे गावातील प्रवासी, विद्यार्थी, माताभगिनींना बसची प्रतिक्षा करताने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत अन्यथा आहे. उन, वारा, पाऊस आदी बाबींचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून तात्काळ या ठिकाणी पुर्वी प्रमाणे बसस्टँड बांधावे. तसेच त्या ठिकाणी केलेले अतिक्रमण हटवावे. गावकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बसस्टँडच्या जागेवर गुरूवार दि. ३० सप्टेंबर पासून बेमुद उपोषण करणार असल्याचा इशारा मल्हार रणनवरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Post a Comment

0 Comments