मुंबई (प्रतिनिधी)राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं.
गेल्या 2 दिवसांपासून या आंदोलनाची आक्रमकता वाढली होती,पण गेल्या 5 दिवसांपासून राज्याचं लक्ष लागलेल्या या आंदोलनाची अखेर सोमवारी सांगता झाली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते ज्यूस पिऊन जरांगे पाटलांनी उपोषण सोडले, तत्पूर्वी सर्व मागण्याचे शासन निर्णय जरांगे पाटील यांना देण्यात आले होते.मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने शासन निर्णय जारी केले, त्यानंतर आझाद मैदानात एकच जल्लोष झाला, मनोज जरांगे पाटील यांनीही शासनाचे आभार मानले. मात्र, आनंदोत्सव साजरा करताना पाटलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले
आझाद मैदानात सगळीकडे विजयाचा, आरक्षणाचा लाभ मिळाल्याचा आणि शासन निर्णय हाती पडल्याचा आनंदोत्सव सुरू होता. मात्र, त्याचवेळी जरांगे पाटलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले, ते पाहून आझाद मैदानही गहिरवल्याचं दिसून आलं.
आझाद मैदानात सगळीकडे आनंद, उत्साह दिसत होताआणि शासन निर्णय हाती पडल्याचा आनंदोत्सव सुरू होता.
जरांगे पाटलांच्या खांद्यावर हात ठेऊन राधाकृष्ण विखे पाटील यांना त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, मैदानावरील स्टेजवर गणपतीची आरती करुन गणपती बाप्पा मोरयाचा जयघोषही झाला.राजेहो तुमच्यामुळे जिंकलो, आपल्या मागण्या मान्य झाल्या असे म्हणताच आझाद मैदानासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मराठा बांधवांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गुलालाची उधळण करत आरक्षण आंदोलनाचा विजयोत्सव झाला.
उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईत आलेल्या सर्व आंदोलकांना गावाकडे जाण्याचे, शांततेत राहण्याचे आवाहन केले. व आंदोलकही आपापल्या गावी परतले.
0 Comments