महात्मा गांधी विद्यालयाचे हॉलीबॉल स्पर्धेत यश




लोहगाव (वार्ताहर): अहिल्यानगर जिल्हा क्रीडा विभाग आणि राहाता तालुका क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ ते १९ वजन गटांमध्ये हॉलीबॉल स्पर्धेत महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. 

गोगलगाव येथे आयोजित तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडूंनी द्वितीय क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले. संघनायक अनिरुद्ध जेजुरकर याच्या नेतृत्वाखाली सुयश तांबे, सार्थक जेजुरकर, कृष्णा  खुळपे, अजय कापसे, सुशांत दळे, रोहन खरात, आदेश मिरपगार, आयुष तरटे, अल्तमस शेख, रहेमान शेख व अमर भिसे या खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले. 
या यशस्वी खेळाडूंचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, एकनाथराव घोगरे, माजी प्राचार्य भिमराव आंधळे, प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्य अलका आहेर, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, डॉ. शरद दुधाट, संजय  डूबे, देवेश आहेर, संजय ठाकरे, नरेंद्र ठाकरे, बाबासाहेब अंत्रे, शिवप्रसाद जंगम आदींसह विद्यार्थी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments