(देवळाली प्रवरा प्रतिनिधी ) =प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे सर=
अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर/राहुरी या मतदार संघातील सन 2025 ची देवळाली प्रवरा नगर परिषद निवडणूक नुकतीच पार पडली. या अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या या लढतीत देवळली प्रवरा नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपा पक्ष्यतर्फे उभ्या असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या. गोरगरिबांचे अडीअडचणीला सतत धाऊन जाणाऱ्या अश्या या लोकप्रिय सौ. सुजाता ताई कदम उर्फ वहिनी व अती सोज्वळ व निरागस असे धडाडीचे तरुण तडफदार व सर्वगुण संपन्न असे राजेंद्र लोखंडे यांना प्रभाग क्रमांक 8 मधील सर्व बंधू आणि भगिनींनी परत एकदा या दोन्हीही थोर समाज सेवकांना या प्रभागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी व प्रभागातील नेतृत्व करण्यासाठी पुन्हा एकदा नगर सेवक या पदावर मोठ्यप्रमाणावर मताधिक्याने विराजमान करून जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. या नगर परिषदेच्या निव डणुकितील विशेष बाब म्हणजे या निवडणुकीच्या रणधुमाळीतच ऐनवेळी राजेंद्र लोखंडे यांचे ज्येष्ठ बंधू शिवतेज सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक स्व. सुरेश लोखंडे यांचे हृदय विकारच्या तीव्र झटक्याने अचानक निधन झाले.
स्व. सुरेश लोखंडे यांचे सामाजिक कार्याची दखल घेऊनच प्रभाग क्रमांक आठ मधिल मतदार बंधू आणि भगिनींनी व मित्र परिवारानी सामाजिक कार्य करण्यासाठी त्यांचें लहान बंधू राजेंद्र उर्फ बाळासाहेब लोखंडे यांना नगर सेवक पदावर विराजमान केले आहे. घरात दुःखाचे वातावरण असतांही त्यांनी आपले स्व. वडील बंधू यांचे नगर सेवक पदाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मोठ्या प्रयासा ने आपली नगर सेवक पदाची विजयश्री खेचून आणली आहे
नवं निर्वाचित नगर सेविका सुजाता ताई कदम उर्फ सुजाता वहिनी यांनी मागील 5 वर्षात केलेल्या उल्लेखनीय अश्या कामाची पावती म्हणून प्रभागातील गोर गरीब जनतेने उपकाराची परतफेड करण्याचा उदात्त दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन त्यांना पुन्हा एकदा नगर सेविका पदावर विराजमान केल्याचे दिसून येत आहे. . सौ सुजाता ताई कदम उर्फ वहिणी या अतिशय प्रामाणिक आणि होतकरू वेक्तिमत्व असून राजकारणा बरोबरच धार्मिक आचरण व सतत समाज विकासाचा ध्यास त्यांच्या मनी असतो थोडक्यात ^^कुणी निंदा अथवा वंदा; समाज विकास करणे हाच आमचा धंदा.^ ^ अश्या प्रकारे आपले आचरण ठेऊन त्यांचे हे समाज विकासाचे कार्य प्रामाणिक पने सतत चालू असते. या देवळाली परिसर आणि प्रभागात ^<समाज विकासाचे पर्व सुजाता ताई कदम उर्फ सुजाता वहिनी ^ अशी त्यांची ख्याती आहे. अश्या या सर्वांच्या लाडक्या सुजाता ताईउर्फ वहिनी या अटितटी च्या व चुरशीच्या लढतीत मोठ्या प्रमाणात मताधिक्याने नगर सेविका या पदावर विराजमान झाल्या. नवनिर्वाचित नगर सेवक श्री राजेंद्र उर्फ बाळासाहेब लोखंडे व सौ सुजाता ताई ऊर्फ सुजाता वहिनी यांना या देवळाली नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक आठ मधे नगर सेवक पदावर विराजमान करण्याकरिता रयत शिक्षण संस्थेतील सेवा निवृत्त प्रा.श्री. ज्ञानेश्वर बनसोडे सर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुशिला ताई बनसोडे या उभयतांनीही ही विशेष उल्लेखनीय असे परिश्रम घेतले आहे..थोडक्यात °°^एकमेका साहाय्य करू: अवघें धरू सुपंथ ^ या उक्ती प्रमाणे या बनसोडे व कुटुंबीयांचे विशेष उल्लेखनीय सहकार्य या दोनही नवनिर्वाचित नगर सेवकांना प्रत्यक्ष: अप्रत्यक्ष लाभले आहे.
त्या प्रित्यर्थ प्रा ज्ञानेश्वर बनसोडे सर व सौ. सुशिला ताई बनसोडे या उभयतांनी एका छोट्याश्या कार्यक्रमाचे आयोजन करून नवनिर्वाचित नगर सेविका सौ.सुजाता ताई कदम उर्फ वहिनी यांचे सह नवं निर्वाचित नगर सेवक श्री राजेंद्र लोखंडे यांना या छोट्याश्या कार्यक्रमात प्रा ज्ञानेश्वर बनसोडे व सुशिला ताई बनसोडे या सुसंस्कारित कुटुंबीयांनी या दोन्हीही नगर सेवकांचां शाल. श्रीफळ. व पुष्प गुच्छ देऊन नुकताच सत्कार केला.
या प्रसंगी सुजाता ताई कदम उर्फ सुजाता वहिनी यांचे पती राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री सुधाकर कदम यांचाही प्रा ज्ञानेश्वर बनसोडे सर यांनी शाल. श्रीफळ व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी राहुरी कृषी विद्यापीठचे श्री प्रवीण देठे साहेब.सामाजिक कार्यकर्ते श्री अनुज दादा बनसोडे. सामाजिक कार्यकर्त्या सौ क्रांती प्रवीण देठे. मनस्वी जाधव. तन्वी देठे.
व आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
या नवनिर्वाचित नगर सेविका सौ. सुजाता ताई कदम उर्फ सुजाता वहिनी व राजेंद्र उर्फ बाळासाहेब लोखंडे या दोनही नवनिर्वाचित नगर सेवक यांच्या हातून सतत समाज सेवा घडो. त्यांच्या कार्यावर परमेश्वर आशीर्वाद पाठवो. त्यांचें सह संपुर्ण कुटूबाला निरोगी जीवन मिळून दीर्घायुष्य लाभो अशी मनोमन प्रार्थना प्रा ज्ञानेश्वर बनसोडे सर व सौ सुशिला ताई ज्ञानेश्वर बनसोडे या उभयतांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात केली आहे.
0 Comments