ज्येष्ठ पत्रकार सतीषराव वैजापूरकर यांना देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार प्रदान! सर्व थरातून त्यांचे होत आहे अभिनंदन!

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी, राहता येथील  दै. सकाळ वर्तमानपत्राचे ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर" यांना या वर्षाचा देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार-२०२५" सुप्रसिद्ध लेखक, वक्ते, ज्येष्ठ पत्रकार आणि "दिल्ली येथील ऑर्गनायझर साप्ताहिकाचे संपादक मा. प्रफुल्ल केतकर" यांच्या शुभहस्ते  हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
मा. सतीश वैजापूरकर यांनी सहकार, शेती, राजकारण या विषयावर दै. सकाळ वर्तमानपत्रात सातत्याने लेखन केलेले आहे. त्यांचा "टक्के टोणपे" हा युट्युब चॅनेल प्रसिद्ध आहे.

 या अगोदरच सकाळ माध्यम समूहाचा डॉ. नानासाहेब परुळेकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासह आजपर्यंत २५ हून अधिक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
विश्व संवाद केंद्र (प. महाराष्ट्र) पुणे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी माध्यम क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या माध्यमकमींना *"देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार" देऊन गौरविण्यात येते.
सन-२०२५ या वर्षाच्या पुरस्कार वितरणाचा सोहळा शुक्रवार दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी ॲम्फी थिएटर फर्ग्युसन महाविद्यालय पुणे या ठिकाणी हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकार सतीशराव वैजापूरकर यांचे सर्व घरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments