टाकळीभान येथे बैलपोळा उत्साहात साजरा


   
     टाकळीभान :  टाकळीभान येथे बैलपोळा डीजे लावून मिरवणूक करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
    सायंकाळी ५. ४५ वाजता गावचे पाटील पटारे यांच्या मानाच्या बैलांची वेशीमध्ये पूजा करून बैलपोळा साजरा करण्यात आला. व त्यानंतर गावातील सर्व बैल वेशीतून डीजेच्या तालावर वाजत गाजत नेण्यात आले.

यावेळी गावचे पाटील दिलीप पटारे, अमोल पटारे, विशाल पटारे, गौरव नाटकर, बाबासाहेब पटारे यांच्या हस्ते बैलांची पूजा करण्यात आली. 
     बळीराजांचा बैलांचा सण म्हणून ओळखल्या जाणार्या पोळ्या निमित्त बैलांना सजविण्यात आले होते. यात्रिकी युगामुळे आता बैलांची संख्या कमी झाली आहे. पुर्वी
येथील मारूती मंदिरा जवळ असलेले पटांगण बैलांना उभे रहाण्यासाठी पुरत नव्हते मात्र आता बैलांची संख्या कमी झाल्याने आता हे पटांगण पुर्ण भरतसुद्धा नाही. तरीपण

बैलपोळा पहाण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments