बैलांची संख्या कमी झाल्यामुळे बैलपोळ्याचा उत्साह झाला कमी!

सावळीविहीर ( प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे श्रावण अमावस्याला पोळा सण साजरा होतो. याही वर्षी तो   साजरा झाला. मात्र दिवसेंदिवस बैलांची संख्या कमी होत चालली आहे. 


त्यामुळे शेकडोंच्या संख्येने श्री हनुमान मंदिरात येणारे बैलांची संख्या आता बोटावर मोजणे इतकी झाली आहे. बैलपोळा हा फक्त फोटोसेशन साठी उरला की काय! असे बोलले जात आहे. एक दोन बैल सजवून श्री हनुमान मंदिरात येतात मात्र या बैलांबरोबर फोटो काढण्यासाठी तरुणांची झुंबड उडते. आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवण्यासाठी अनेकजण बैलांबरोबर फोटो काढतात असा हा बैलपोळा आता अशा प्रकारे साजरा होत आहे. सोशल मीडियावर बैलपोळ्याच्या शुभेच्छा देण्यात येतात. मात्र पूर्वीप्रमाणे प्रत्यक्षात वाचत गाजत श्री हनुमान मंदिरात शेतकरी राजा आपल्या बैलांना घेऊन त्यांना मिरवणूक काढत पुरणपोळीचा नैवेद्य देत असत. मात्र आता अनेकांकडे बैल नसून ट्रॅक्टर आली आहेत. ट्रॅक्टरने शेतीचे मशागत होत आहे. बैलांच्या ऐवजी गाया झाल्या आहेत. शेतकरी दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करताना दिसतो. त्यामुळे सर्व शेतकरी आपल्या गाईंनाही पोळ्याच्या दिवशी धुवून सजवताना दिसून आली. त्यांची पुरणपोळीचा नैवेद्य देऊन पूजा केली. बैलांची संख्या कमी झाल्यामुळे बैल पोळ्याचा सण हा हळूहळू काहीसा बदलत चालल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments