उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आज रविवारी दुपारी संगमनेर दौऱ्यावर! जाणता राजा मैदानावर जाहीर सभा होणार!

शिर्डी ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज रविवारी दुपारी येत असून संगमनेर येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे.विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून यश मिळाल्याबद्दल सर्व मतदारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महायुतीच्या वतीने भव्य महामेळाव्याचे आयोजन आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरातील जाणता राजा मैदानावर रविवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे.

यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर महावेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अहिल्यानगर दौरा रविवारी दुपारी होणार आहे.
 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी चार वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंदूर विमानतळ येथुन विमानाने शिर्डी विमानतळ, काकडी, ता. कोपरगांव कडे प्रयाण करणार आहे. त्यानंतर ४ वाजून १५ वाजता शिर्डी विमानतळ, काकडी, ता. कोपरगांव येथे आगमन होणार आहे. त्यानंतर हेलिकॉप्टरने संगमनेर कडे प्रयाण करणार आहे. त्यानंतर ४ वाजून ४५ वाजता संगमनेर महाविद्यालय हेलिपॅड येथे आगमन होणार आहे. तसेच मोटारीने जाणता राजा मैदान, संगमनेर कडे प्रयाण करणार आहे. त्यानंतर पाच वाजता शिवसेना महायुती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व नंतर जाणता राजा मैदानावर जाहिर आभार सभा होणार आहे. असे समजते. या मेळाव्याची संगमनेर येथे जय्यत तयारी झाली आहे.

Post a Comment

0 Comments