टाकळीभान प्रतिनिधी- पंचायत समितीच्या मा. सभापती व प्राईडच्या संस्थापिका डॉ. वंदनाताई मुरकुटे व माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक माऊली मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली भेर्डापूर-वांगी येथे सुरु असलेल्या प्राईड अॅकेडमी इंग्लिश मेडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी श्रीरामपूर एम.आय.डी.सी.येथे तयार केलेल्या रायगड प्रतिकृतीस भेट दिली.
प्राईड अॅकेडमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रभेटीची आयोजन करत असते. पुस्तकी ज्ञानासोबतच जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्राची माहिती व्हावी या उद्देशाने श्रीरामपूर एम.आय.डी.सी. येथील ट्रस्टवेल इंजिनिअर या कंपनीने तयार केलेल्या रायगड प्रतिकृती तसेच श्री इम्पेक्स या फर्निचर क्षेत्रात नावारूपाला आलेल्या फर्निचर मॉलला विद्यार्थ्यांनी भेट दिली.
विद्यार्थ्यांनी ट्रस्टवेल इंजिनिअर कंपनीस भेट दिली असता याठिकाणी रायगड किल्ल्याची भव्य अशी प्रतिकृती साकारण्यात आलेली होती. रायगडावरील गंगासागर तलाव, महादरवाजा, हिरकणी बुरुज, शिवरायांचे सिंहासन, राजवाडा, मुख्य बाजारपेठ, टकमक टोक, जगदीश्वर मंदिर आदी. सर्व गोष्टीची उल्लेख हुबेहूब करण्यात आलेला होता. संयोजकांनी या सर्वांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदीप्यमान इतिहास विद्यार्थ्यांना कळावा या हेतूने या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते.
यानंतर विद्यार्थ्यांनी श्री इम्पेक्स मॉलला भेट दिली. यासाठी संचालक अविनाशे कुदळे साहेब यांनी विद्यार्थ्यांना फर्निचरबद्दल माहिती दिली. श्री इम्पेक्सच्या उभारणीपासून आजपर्यतच्या प्रवासातून ध्येयप्राप्तीसाठी जिद्द व चिकाटी, तसेच कठोर परिश्रम याशिवाय पर्याय नाही, हे विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले.
0 Comments