दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवाची सर्वत्र जय्यत तयारी! मंडप ,सजावटीचे काम अंतिम टप्प्यात!

शिर्डी ( प्रतिनिधी) महाराष्ट्रात सर्वात मोठा उत्सव समजला जाणारा गणेश उत्सव दोन तीन दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. शहरांपासून ग्रामीण भागात वाड्यावर सार्वजनिक गणेश मंडळे या उत्सवाची जोरदार तयारी करत आहेत. गणेशोत्सवाची अंतिम तयारी झाली असून, मंडप स्टेज, मंडपात मांडणी आणि सजावट अंतिम टप्प्यात आहे, गणेश मूर्तींवर रंगरंगोटी आणि अंतिम हात फिरवला जात आहे, तर मिरवणुकीच्या नियोजनावर लक्ष केंद्रित केले जात आहे. यावर्षी श्रींच्या मूर्तींच्या किंमतीत वाढ झाल्याचेही पाहायला मिळत आहे. 
शहरांमध्ये आणि गावांमध्ये गणपती मंडळांनी मंडप उभारले असून, सजावट अंतिम टप्प्यात आहे. 
मूर्तिकार गणपती बाप्पाच्या मूर्तींना अंतिम स्वरूप देत आहेत, ज्यामध्ये रंगरंगोटी आणि इतर कामे केली जात आहेत. 
संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण असून, बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र लगबग सुरू आहे. दरम्यान विविध आकाराचे छोटे-मोठे रंगीबेरंगी आकर्षक अशा  श्री गणेशाच्या मुर्त्या बाजारात विक्रीसाठी दिसून येत आहे. गणेश उत्सवाला घरोघरी श्री गणेशाची स्थापना केली जाते. त्याचप्रमाणे सार्वजनिक मंडळेही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. त्यासाठी श्री गणेशाची मूर्ती वाजत गाजत घरी आणली जाते. गणेश उत्सवाला दोन-तीन दिवस बाकी राहिल्यामुळे गणेश मूर्ती वाजत गाजत आता घरी येऊ लागले आहेत. आरास करण्यासाठी सजावटीची खरेदी होत आहे. त्यामुळे मार्केट ग्राहकांनी फुलून गेले आहे. सर्वत्र गणेशाची धूम असून ढोलीबाजा, बँड पथक, लेझीम पथक यांचा सराव  जोरात सुरू आहे. एकूणच गणेश उत्सवाची सर्वत्र जय्यत तयारी होत आहे.

Post a Comment

0 Comments