बेल‌ पिंपळगाव येथील भिल्ल समाजाच्या आंदोलनला यश.




शिर्डी.. प्रतिनिधी 
बेल पिंपळगाव ता. नेवासा येथील आदिवासी भिल्ल समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या उपोषणाला यश आले असून जिल्हाधिकाऱ्यांनी आर्टिकल ६५ प्रमाणे कारवाई करण्याचे नेवासा तहसीलदारांना आदेश केले आहेत. 

             नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील आदिवासी भिल्ल समाजाने १९६१ पासून कसत असलेल्या त्यांच्याच वडिलोपार्जित जमिनीचा लिमिटेशन ऍक्ट १९६३ चे कलम २७ व आर्टिकल ६५ प्रमाणे कारवाई करून आमच्या नावे जमिनीचा सातबारा करून शासकीय नियमाप्रमाणे आम्हाला जमिनीचा ताब द्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर समोर एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व तंट्या तात्या क्रांती फोर्स चे अध्यक्ष संपतराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते.

 जिल्हाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली व कागदपत्री पुरावे बघितल्यानंतर नेवासा तहसीलदार यांना सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधित आदिवासींच्या जमिनीचा चौकशी अहवाल इकडील काढल्यास सादर करण्यात यावा असा आदेश केला. त्यानंतर नेवासा तहसीलदार यांनी सर्कल चौकशी आदेश काढले असून आदिवासींच्या जमिनीची स्थानिक सर्कल चौकशी सुरू झाली आहे. लवकरच नेवासा तहसीलदार यांच्याकडून जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे अहवाल सादर होईल व आदिवासींना त्यांच्या हक्काची जमीन मिळेल. त्यामुळे बेलपिंपळगाव येथील आदिवासी भिल्ल समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आपल्या हक्काची जमीन आपल्याला मिळणार असल्याने एक नवीन उत्साह त्यांच्यामध्ये निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात आंदोलन सुरू होते त्यामुळे न्याय मिळेपर्यंत माघार नाही अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली होती. शेवटी बेल पिंपळगाव येथील आदिवासींना न्याय मिळालाच आहे.

Post a Comment

0 Comments