दिलीप शिंदे
सोयगाव दि२८-निकाली काढण्यात आलेल्या तक्रार अर्जावर कोणतीही कारवाई न केल्याने त्यासाठी बक्षीस म्हणून तडजोडी अंती तीन हजार रु ची लाच खासगी इसमांकडून घेतांना रंगेहाथ पकडून सोयगाव पोलीस ठाण्याचे दोन पोलिसांसह दोन खासगी इसम असे चार जणांना अटक केल्याची घटना गुरुवारी तीन वाजता सोयगाव शहरात घडली. सोयगाव - फर्दापूर रस्त्यावरील हॉटेल न्यू मुरली जवळ ही कारवाई केली आहे.
याप्रकरणी दोन पोलीस व दोन खासगी इसम असे चार जणांविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक पथकांनी सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे .
सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्या विरोधातील पंधरा दिवसांपूर्वी आलेला तक्रार अर्ज निकाली काढण्यात आला होता. सदर निकाली काढलेल्या तक्रार अर्जात तक्रारदाराच्या विरोधात कोणतीच कारवाई केली नाही म्हणून बक्षीस/मोबदला म्हणून सोयगाव पोलीस ठाण्याचे जमादार राजू बर्डे व पोलीस रवींद्र तायडे यांनी जरंडी येथील अरविंद राठोड या हॉटेलचालकामार्फत पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी या लाचेतील पाच हजार रु (दि.२५ आगस्ट) रोजी फोन पे द्वारे अन्य इसमाला पाठवून दिलं होते. त्यानंतर देखील सोयगाव पोलीस ठाण्याचे दोन्ही पोलीस हे हॉटेल चालकामार्फत तक्रारदाराकडे उर्वरित दहा हजार रुपये मागणी करीत असल्याची तक्रार (दि.२८) रोजी ला प्र वि कार्यालय छत्रपती संभाजी नगर येथे प्राप्त झाली होती.यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दि.२८ गुरुवारी सोयगाव येथील हॉटेल न्यू मुरली मध्ये सापळा रचला असता उर्वरित दहा हजार रु ऐवजी तडजोडी अंती पोलीस शिपाई रवींद्र तायडे यांनी तीन हजार रु घेण्याचे कबूल केल्या वरून सदर रक्कम मुरली हॉटेलचे मालक सुनील सोनोने यांचेकडे देण्याचे सांगितल्यावरून मुरली होटेल चे मालक सुनील सोनोने यांनी तीन हजार रु घेवुन ती रक्कम ताब्यात घेण्यासाठी पोलीस शिपाई रवींद्र तायडे हॉटेलमध्ये हजर होते त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक पथकांनी ताब्यात घेऊन अरविंद राठोड(होटेल चालक जरंडी वय २९) रविंद्र रामदास तायडे(पोलीस शिपाई वय ३८) जमादार राजू बर्डे(वय ३६) व सुनील मुरलीधर सोनोने(सोयगाव हॉटेल चालक वय ५३) यांना अटक करून त्यांच्या ताब्यातील तीन मोबाईल व लाचेची रक्कम तीन हजार रु असा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे,अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे,पोलीस उप अधीक्षक सुरेश नाईकनवरे,यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधकचे पोलीस निरीक्षक योगेश शिंदे,सापळा अधिकारी वाल्मिकी कोरे,राजेंद्र जोशी, प्रकाश डोंगरदिवे, सी. एन बागुल आदींनी ही कारवाई केली आहे.
चौकट:- सोयगाव तालुक्यात अवैध रित्या गौण खनिज उत्खनन करून सर्रास दिवस रात्र वाहतूक केली जात. गौण खनिज माफियांचे व महसूलचे आर्थिक लागेबांधे असल्याने कोणतीही कार्यवाही केली जात नाही यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल सोयगाव तालुक्यात बुडत आहे. गुरुवारी सोयगावात छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या धडक कारवाईची बातमी शहरासह शासकीय कार्यालयात वाऱ्यासारखी पसरल्याने सोयगाव तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये धावपळ सुरू झाली होती,अनेकांनी काही तासांसाठी कार्यालय सोडले होते तर काहींनी घरचा रस्ता धरला होता.
दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
0 Comments