टाकळीभान प्रतिनिधी -
टाकळीभान ग्रामपंचायतीची ग्रामसभा सत्ताधाऱ्याऱ्यांच्या साडेचार वर्षांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत गदारोळातच पार पडली.
अध्यक्षस्थानी सरपंच अर्चना रणनवरे होल्या. सरत्या पंचवार्षिक सत्तेतील शेवटची ग्रामसभा असल्याने सर्व वक्त्यांनी सत्ताधारकांना लक्ष्य करून परत गेलेल्या निधीचा जाब मागितला. त्यामुळे वेळोवेळी खटके उडताना दिसले. अनेक विद्यमान सदस्यांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवल्याने विरोधक आक्रमक होते.
स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसभेचे आयोजन काल गुरुवार दि. २८ ऑगस्ट रोजी ग्रामसचिवालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. सुमारे तीन तास ही ग्रामसभा गदारोळात सुरु होती. गेल्या साडेचार वर्षातील सत्ताधा-यांच्या कामकाजावरसर्व वक्त्यांनी टीका करत केलेल्या विकास कामांच्या यादीची मागणी केली.
यावेळी बापूसाहेब नवले यांनी गेल्या साडेचार वर्षांत ग्रामसभेत उपस्थित केलेल्या किती तक्रारींवर दखल घेतली गेली याचा लेखाजोखा मागितला. संपूर्ण कार्यकाळात सत्ताधान्यांनी ग्रामसभेची खिल्ली उडविल्याचा आरोप झाला. महावितरणने स्मार्ट मीटरची सक्ती करु नये असा प्रस्ताव त्यांनी ग्रामसभेत मांडला. अनिल बोडखे यांनी सत्ताधाऱ्यांच्या साडेचार वर्षांच्या कामांचा लेखाजोखा मागितल्याने व सत्ताधारकांकडे
माहितीच उपलब्ध न झाल्याने चांगलाच गदारोळ झाला. संजय रणनवरे यांनी कामगारांचे पगार वाढवून द्यावेत, आठवड्या बाजाराच्या करवसुलीचा ठेका ग्रामस्थांना माहिती न देता दिल्याने फेरलिलावाची मागणी केली. रामेश्वर आरगडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी केली. तसेच साडेचार वर्षात सदस्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे ४५ लाखांचे अद्यावत वाचनालय, १० लाखांचे बसस्टँड, ६० लाखांचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, २ कोटींची जलजीवन योजना, १० लाखांचे आ. कानडे यांच्या निधीतील पथदिवे व इतर कामे सुरू न केल्याने काही निधी परत गेला तर काही परत जाण्याच्या मार्गावर असल्याचे सांगून गावाच्या विकासाला सत्ताधाऱ्यांनी खोडा घातल्याचा थेट आरोप केला.
सत्ताधाऱ्यांनी गेल्या निवडणुकीत खोटी आश्वासने देऊन मत मिळवले व सत्तेत आले; तरुणांना व्यापारी गाळे दिले नाहीत किंवा रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले नाहीत. साडेचार वर्षात कोणतेही भरीव निधी किंवा भरीव काम न करता आलेला निधी परत पाठवणारे हे सदस्यमंडळ ठरलेआहे, असा आरोप भाजपचे नारायण काळे बांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
माजी उपसरपंच भारत भवार यांनी पाच घरकुल लाभार्थ्यांची ग्रामपंचायतीकडून जाणून बुजून अडवणूक केली जात असल्याचा आरोप केल्यावर मोठा गदारोळ झाला. सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब शिंदे यांना घरकुलाचे अतिक्रमण शासनाच्या आदेशानुसार नियमनाचे काम करण्यात येणार असल्याने पाच लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी करण्यात आली.
तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब बनकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष अबासाहेब रणनवरे यांची निवड करण्यात यावी, अशी सूचना माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे यांनी मांडली. ग्रामसभेत टाळ्याच्या गजरात या सूचनेला अनुमोदन मिळाले. रणनवरे यांच्या रिक्त जागी अनिल दाभाडे यांच्या नावाची सूचना अप्पासाहेब रणनवरे यांनी मांडली. ग्रामसभेने या दोन्ही निवडींना मान्यता दिली.
यावेळी उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी उपस्थित केलेल्या काही तक्रारींना उत्तर दिले. शेवटी सरपंच अर्चना रणनचरे यांनी एका ओळीत ग्रामस्थांनी उपस्थित केलेले प्रश्न सोडवले जातील असे सांगून ग्रामसभेचा समारोप केला. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या ग्रामसभेत अनेक मुद्यांवर वेळोवेळी गदारोळ झाला.
यावेळी मंजाबापू थोरात, राहुल पटारे, भाऊसाहेब पवार, जालिंदर बोडखे, आबासाहेब रणनवरे,भाऊसाहेब मगर, दिलीप पवार, सुधीर मगर, अशोक कचे, जयकर मगर, भाऊसाहेब पटारे, संतोष पटारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments