सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा--



दिलीप शिंदे
सोयगाव दि.२९- सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात  राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास प्राचार्य डॉ. शिरीष पवार अध्यक्षस्थानी होते.तर प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे, पदव्युत्तर समन्वयक डॉ. शत्रुघन भोरे, कनिष्ठ विभाग प्रमुख डॉ. उल्हास पाटील, पंकज गावित उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. निलेश गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना खेळांविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी क्रीडा हा शारीरिक व मानसिक विकासाचा आधार असून जीवनात शिस्त, संघ भावना आणि आत्मविश्वास निर्माण करणारा घटक असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच खेळातही प्रावीण्य मिळवावे असे आवाहन केले. विद्यार्थ्यांमध्ये खेळांविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून महाविद्यालयात गोळाफेक, क्रिकेट, बुद्धिबळ, खो-खो व कबड्डी, ॲथलेटिक्स या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश गावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सुनील चौधरी यांनी मानले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments