नारायण काळे मुकुंद हापसे यांची निवड.

दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी-  टाकळीभान येथील नारायण काळे यांची भाजपाच्या अहिल्यानगर उत्तर नगर जिल्हा सचिव पदी तर मुकुंद हापसे यांची श्रीरामपूर तालूका उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, भाजपा प्रदेश कार्यालय प्रभारी व उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे यांच्या मार्गदर्शना खाली तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर व तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे यांच्या सूचने नुसार भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

 या कार्यकारणीत नारायण काळे व मुकुंद हापसे यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments