टाकळीभान प्रतिनिधी-:जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद तसेच श्रीरामपूर तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आर . बी . एन .बी . कॉलेज श्रीरामपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या , टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक आर .एम . शिंदे यांनी दिली आहे .
श्रीरामपूर येथील आर . बी . एन .बी . कॉलेजवर नुकत्याच श्रीरामपूर तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या . या स्पर्धेत हर्षद विष्णू पटारे याने 52 किलो वजन गटात प्रथम क्रमांक ,समर्थ विष्णू पटारे याने 51 किलो वजन गटात तृतीय क्रमांक ,आरीश सलीम सय्यद याने 71 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक, बलराम प्रताप रणनवरे याने 80 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक ,करण बाबासाहेब गव्हाणे याने 92 किलो वजन गटात प्रथम क्रमांक, शिवम विलास कर्णे याने 57 किलो वजन गटात तृतीय क्रमांक, दत्ता संतोष माने याने 61 किलो वजन गटात द्वितीय क्रमांक पटकावला असून, यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने ,टाकळीभान सोसायटीचे चेअरमन व स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मंजाबापू थोरात , स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य राहुल पटारे , व पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमींनी अभिनंदन केले आहे .यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक आर .एम .शिंदे ,पर्यवेक्षक एस . एस . जरे ,क्रीडाशिक्षक एस .एस . राठोड आदींचे मार्गदर्शन लाभले
0 Comments